Yogiya Durlabh To Mya Dekhila Abhang Lyrics in Marathi योगियां दुर्लभ तो म्यां देखिला साजणी । पाहतां पाहतां मना न पुरेचि धणी ॥१॥ देखिला देखिला गे माये देवाचा देवो । फिटला संदेहो निमालें दुजेपण ॥२॥ अनंतरूपें अनंतवेषें देखिला म्यां त्यासि । बाप रखुमादेविवरू खूण बाणली कैसी ॥३॥ – संत ज्ञानेश्वर