लहान असो वा मोठी
बहीण हवी एक तरी पाठिशी
प्रेमळ असो वा थोडी चिडकी
बहिण असतेच नेहमी हवीशी
बहिणीचं प्रेम हृदयात जपायचे असते
तीने केलेले त्याग स्मरणात ठेवायचे असते
बहिण मिळणे किती सुखद असते
हे बहिण मिळाल्या शिवाय कळत नाही
बहिण नसली कि आयुष्याचे काही भाग जगायचा राहते
सारं आयुष्य जगूनही मग रिते रिते वाटते
लग्न होऊन सासरी जाणारी ताई बघून डोळे भरून येतात
आजवर जगलेले क्षण नजरेसमोरून अलगद निघून जातात
