बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण…
भाग्यवान असतात ती लोक ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो.
इच्छा पूर्ण होतात सर्व जर वडील त्याच्याबरोबर असतात.
हॅप्पी फादर्स डे!
Marathi WhatsApp Messages on Father
बाप असतो तेलवात जळत असतो क्षणा क्षणाला,
हाडांची काडे करून आधार देतो मन मनाला
कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा,
शांत प्रेमळ कठोर रंगीत बहुरूपी बाबा
“बाबा” एकमेव माणूस जो माझ्यावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतो!
आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आई बाबांच्या चेहऱ्यावरील सुखद हास्य आणि त्याच कारण तुम्ही स्वतः असणं
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता
आणि तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता
Fathers Day Marathi Messages
कधी शांत, कधी रागीट कधी प्रेमळ, कधी वात्सल्य
कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या लाडक्यांना पप्पांना
फादर्स डेच्या मन भरुन शुभेच्छा!
आपले दुःख मनात लपवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
हॅप्पी फादर्स डे!
खिसा रिकामा असूनही त्यांनी कधी नकार दिला नाही
माझ्या वडिलांनपेक्षा श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही
माझ्या प्रत्येक संकटाच्या वेळी एक हात नेहमी माझ्या खांद्यावर होता..
तो कोणी नाही… माझा लढाऊ बाप होता…
हॅप्पी फादर्स डे!
WhatsApp Messages for Father in Marathi
वडील हे आपल्या आयुष्यातील असे व्यक्तिमत्त्व असते जे स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आपल्या मुलांच्या आनंदासाठी आणि यशासाठी आयुष्यभर मेहनत करत असतात. त्यांच्या प्रेमाला शब्दांत व्यक्त करणे कठीण असले तरी काही मनापासूनचे संदेश त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतात. म्हणूनच अनेकजण वडिलांसाठी WhatsApp Messages शोधतात, जेणेकरून आपल्या भावना सुंदर शब्दांत व्यक्त करता येतील.
वडील म्हणजे घराचा मजबूत आधारस्तंभ. ते नेहमी आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करतात आणि प्रत्येक कठीण प्रसंगी खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या मायेची आणि काळजीची जाणीव अनेकदा शब्दांत मांडता येत नाही. अशा वेळी मराठीतले भावनिक संदेश आपल्या मनातील भावना पोहोचवण्याचे उत्तम माध्यम ठरतात.
Marathi Father’s Day WhatsApp Messages
फादर्स डे हा वडिलांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस आहे. या दिवशी एक प्रेमळ संदेश पाठवून तुम्ही त्यांना सांगू शकता की त्यांच्या त्यागामुळे आणि मार्गदर्शनामुळे तुमचे आयुष्य अधिक सुंदर झाले आहे. खास Father’s Day WhatsApp Messages वडिलांना पाठवून त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करता येते.
आजच्या डिजिटल युगात व्हॉट्सऍपद्वारे शुभेच्छा देणे खूप सोपे झाले आहे. त्यामुळे मेसेजेस वापरून तुम्ही वडिलांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता सहज व्यक्त करू शकता. तसेच Father’s Day WhatsApp Messages द्वारे त्यांच्या आयुष्यातील योगदानाची आठवण करून देत त्यांचा दिवस अधिक खास बनवू शकता.
वडील हे फक्त कुटुंबाचे प्रमुख नसतात, तर ते आपल्या जीवनातील पहिले मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि खरे हिरो असतात. त्यांच्यासाठी पाठवलेला एक छोटासा संदेश देखील त्यांच्या मनाला आनंद देऊ शकतो. त्यामुळे या फादर्स डे निमित्त किंवा कोणत्याही खास प्रसंगी आपल्या वडिलांना प्रेमळ मराठी संदेश पाठवा आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा.
