Vithu Mauli Song Lyrics in Marathi

विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठलाss पांडुरंगा

अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

लेकरांची सेवा केलीस तू आई
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

विठ्ठला मायबापा
विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ती विठ्ठलाची

चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)
गीतकार : जगदीश खेबुडकर
संगीतकार : अनिल-अरुण
गायक : सुधीर फडके – सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी