Vishvache Aart Maze Mani Abhang Lyrics in Marathi विश्वाचें आर्त माझे मनीं प्रकाशले । अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥ आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें । नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥ बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला । हृदयीं नीटावला ब्रह्माकारें ॥३॥ – संत ज्ञानेश्वर