Visava Vitthal Sukhachi Sauli Abhang Lyrics in Marathi

विसांवा विठ्ठल सुखाची साउली ।
प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी ॥१॥

दाखवीं चरण दाखवीं चरण ।
दाखवीं चरण नारायणा ॥२॥

विठ्ठल आचार विठ्ठल विचार ।
दावीं निरंतर पाय आतां ॥३॥

नामा ह्मणे नित्य बुडालों संसारीं ।
धांवोनियां धरीं हातीं मज ॥४॥

– संत नामदेव