Variyane Kundal Hale Abhang Lyrics in Marathi

वारियाने कुंडल हाले ।
डोळे मोडित राधा चाले ॥१॥

राधा पाहून भुलले हरी ।
बैल दुभवी नंदाघरी ॥२॥

फणस जंबीर कर्दळी दाटा ।
हाति घेऊन नारंगी फाटा ॥३॥

हरि पाहून भुलली चित्ता ।
राधा घुसळी डेरा रिता ॥४॥

ऐसी आवडी मिनली दोघां ।
एकरूप झाले अंगा ॥५॥

मन मिळालेसे मना ।
एका भुलला जनार्दना ॥६॥

– संत एकनाथ