Utha Utha Pandhari Natha Song Lyrics in Marathi

ऊठ ऊठ पंढरीनाथा
ऊठ बा मुकुंदा
उठ पांडुरंगा देवा
पुंडलिक वरदा

अस्त पातलासे चंद्रा
तारका विझाल्या
फुलत फुलत वेलीवरच्या
कळ्या फुले झाल्या
जाग पाखरांना आली
जाग ये सुगंधा

पात्र पाणियाचे हाती
उभी असे भीमा
दर्शनास आले
तुझिया ज्ञानदेव-नामा
भक्तराज चोखामेळा
दुरून देई सादा

देह-भाव मिळुनी केला
काकडा मनाचा
निघून धूर गेला
अवघ्या आस-वासनांचा
ज्ञानज्योत चेतविली ही
उजळण्या अवेदा

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके
चित्रपट – झाला महार पंढरीनाथ