Utha Utha Chiutai Balgeet Lyrics in Marathi

उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले
डोळे तरी मिटलेले अजूनही अजूनही

सोनेरी हे दूत आले घरट्याच्या दारापाशी
डोळ्यांवर झोप कशी अजूनही अजूनही

लगबग पाखरे ही गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे चोहीकडे चोहीकडे

झोपलेल्या अशा तुम्ही आणायाचे मग कोणी
बाळासाठी चारापाणी चिमुकल्या चिमुकल्या

बाळाचे मी घेता नाव जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई भूर भूर भूर भूर