Utha Sakal Jan Uthile Abhang Lyrics in Marathi उठा सकळजन उठिले नारायण । आनंदले मुनिजन तिन्ही लोक ॥१॥ करा जयजयकार वाद्यांचा गजर । मृदंग विणे अपार टाळ घोळ ॥२॥ जोडोनिया कर मुख पाहा सादर । पायावरी शिर ठेवूनियां ॥३॥ तुका ह्मणे काय पढियंते तें मागा । आपुलालें सांगा दु:ख सकळ ॥४॥ – संत तुकाराम महाराज