Tu Jevha Nightes Marathi Nirop Kavita

तू जेव्हाही निघतेस माझा निरोप घेऊन
तेव्हा तुझ्या डोळ्यात मी मला पाहतो

तू थोडं अजून थांबावस म्हणून
तुझं मन ओळखून हात मी धरतो

तेव्हा नजरेस नजर तू माझ्या भिडवतेस
डोळ्यात डोळे घालून वेड्यासारखी बघतेस

येईनच मला सांगतेस, जाऊ दे ना आता पुन्हा भेटू म्हणतेस
मी हि सांगतो नजरेनेच चल जा आता

तेव्हा मात्र तुझे पाऊल न पुढे पडते
प्रत्येक वेळेस जाताना असे का घडते
तू नजरेआड होईपर्यंत मन तुला पाहत राहते


View All Nirop Marathi Kavita


 

Liked it? Share with your friends...

One thought on “Tu Jevha Nightes Marathi Nirop Kavita

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *