Teacher Student Jokes in Marathi

आज सायंकाळी गणिताच्या शिक्षिका बस स्टॉप वर भेटल्या. त्यांच्या पाया पडून तब्येतीची विचारपूस केली.

निघताना सहज विचारलं, “तुमचा मोबाईल नंबर असेल तर द्या !”

नऊ अब्ज चौऱ्याऐंशी करोड ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार पाचशे पंचे चाळीस

पुन्हा विचारणार होतो पण बाईंचा मार आठवला


संस्कृत मधले झकास जोक्स
मास्तर : कर्मण्येवाधिकारस्ते मां फलेषु कदाचन। चिंटू याचा अर्थ सांग?
चिंटू : करमत नसल्यामुळे राधिका रस्त्यावर फिरत असते, कदाचित तिला फळ घ्यायची असतील

मास्तर : बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन! याचा अर्थ काय?
चिंटू : माझे अनेक जन्म झाले आहेत पण तुझा जन्म चार जूनला झाला आहे

मास्तर : बरं आता सांग, “दक्षिणे लक्ष्मणोयस्य वामे तु जनकात्मजा” याचा अर्थ काय?
चिंटू : दक्षिणेकडून लक्ष्मण आला आणि म्हणाला… जनका… तुझी मजा आहे

मास्तर – चिंटू , याचा अर्थ सांग- हे पार्थ त्वम् चापि मीम: चापि
चिंटू – हे अर्जुना, तू (शांतपणे) चहा पी, मी पण पितो


गुरुजी – ”जीवात जीव येणे” याचा अर्थ सांगा
विद्यार्थी – गर्भवती होणे
गुरुजी – तू येत नको जाऊ रे शाळेत


परीक्षेमध्ये पेपर खूप कठीण असतो आणि मास्तर पण खूप कडक असतात. कॉपी पण करता येत नसते. शेवटच्या बेंचवर बसलेल्या बंड्याने परीक्षकाला एक चिट्ठी दिली. परीक्षकाने चिट्ठी वाचली आणि चुपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
बंड्याच्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले “यार तू काय लिहिलं होतं त्या चिट्ठीत?”
बंड्या म्हणाला, “मी लिहिलं होतं – सर, तुमची पॅन्ट मागून फाटली आहे”


बंड्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे इन्स्पेक्टर येतात. सामान्य विज्ञानाच्या पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून बंड्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
बंड्या : काय ओळखू येत नाय.
इन्स्पेक्टर: मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
बंड्या : माझे पाय बघा आणि तुमीच सांगा


गुरुजी : गण्या जगात देश किती ?
गण्या : १ च देश आहे….. भारत
गुरुजी ; (संतापून) आणि मग अमेरिका , पाकिस्तान, चिन, नेपाळ ह्या काय तुझ्या सासूरवाड्या आहेत का?
गण्या : गुरुजी, हे तर विदेश आहेत ना


शिक्षक : बंड्या, तू नेहमी ऊशिरा का येतो? तुझे मित्र बघ कसे वेळेवर येतात. तुला त्यांच्याबरोबर यायला काय झाले?
बंड्या : सर, झुंड मे तो सुवर आते है, शेर अकेला आता है.
सरानी काळा निळा होईपर्यंत हाणला आणि शाळा सुटलयावर मित्रांनी पोत्यात घालून हाणला


भूगोलाच्या लुकडया बाईंनी वर्गातील मुलांना प्रश्न विचारला : मुलांनो पृथ्वी का फिरते?.
एक कारट लगेच उभ राहिलं अन म्हणालं : बाई जरा खात पीत जावा ! तुम्हाला चक्कर आली असेल


सर : तुझे बाबा कुठे काम करतात रे गण्या?
गण्या : HDFC मध्ये
सर : सांग बर HDFC चा Full form काय आहे?
गण्या : हरीभाऊ धोंडीबा फरसान सेंटर


शाळेतील सर्वात खतरनाक अनुभव – जेव्हा प्रार्थनेला उभा राहायचो आणि स्टेज वरून सूचना यायची ‘काल पळून गेलेले समोर या…’ अन सगळे आपल्याकडे वळून पाहायचे आणि बोलायचे “जा ना पुढे”


मॅडम : गंगा, यमुना, कावेरी, कृष्णा, गोदावरी, भीमा ह्या भारताच्या नद्या आहेत तर पाकिस्तानच्या नद्यांची नवे सांगा
विद्यार्थी : रुक्सना, रिझवाना, हसीना, फातिमा, रुमाना इत्यादी


जोशी गुरुजी : मी प्रश्न विचारला की त्याचं उत्तर पटकन द्यायचं
मुलगा : हो सर
जोशी गुरुजी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण?
मुलगा : पटकन
गुरुजींनी मुलाला लोळवून लोळवून हाणला


मास्तर : दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
बंड्या : दहा
मास्तर : ते कसे?
बंड्या : नसलेले नारळ सुद्धा नारळच राहतील… त्यांचा काय फणस होणार?


गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या सर्वांनी ३० पर्यंत पाढे पाठ करून यायचे. पुढच्या दिवशी-
बाई : ऊठ मक्या, संग २७ नव्वे (२७*९) किती?
मक्या जरावेळ विचार करतो आणि सांगतो, “लई सोपं हाय बाई,  २७० वजा २७


शिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल?
विद्यार्थी : १-२ तास बघणार, कोणी नेला तर ठीक आहे नाहीतर Staff Room मध्ये जमा करणार


Master : मुलांनो सांगा ५ – ५ किती?
सगळी मुले शांत
Master : सांग बंड्या, जर तुझ्याकडे ५ इडल्या आहेत आणि मी ५ इडल्या खाल्या तर तुझ्याकडे काय उरेल?
Bandya : सांबर आणि चटणी


Master : मुलांनो पाण्याचा अपमान कसा कराल?
Bandya : मास्तर, पाणी गरम करायचं आणि अंघोळच नाही करायची


स्थळ : शाळेचा वर्ग इंग्रजीचा तास
Mastar : बंड्या सांग Shall कधी वापरतात?
Bandya : थंडीत


Master : विद्यार्थी जास्त वेळ झोप का काढतात
Bandya : कारण आमची स्वप्नं फार मोठी असतात


Marathi School Jokes


गुरुजी : गण्या जगात देश किती ?
बंड्या : एकच देश आहे, भारत
गुरुजी : (संतापून) आणि मग अमेरिका, पाकिस्तान, चीन, नेपाळ काय आहे?
बंड्या : गुरुजी, ते तर विदेश आहेत ना


Mastar : बंड्या सांग बरं जास्त नशा कशात आहे ?
Bandya : पुस्तकात
Mastar : कसं काय ?
Bandya : उघडलं की झोप येते.
मास्तरांनी पुस्तक फाटेपर्यंत मारलं


मास्तर : बंड्या वाघ तुझ्या मागे लागला तर तु काय करशील?
बंड्या : मी झाडामागे लपेन
मास्तर : अन् वाघाने तुला तिथे बघीतले तर?
बंड्या : मी झाडावर चढेन
मास्तर : अन् वाघ झाडावर पण चढला तर?
बंड्या : मी नदीमध्ये उडी मारेन
मास्तर : अन् जर वाघाने नदीमधे पण उडी मारली तर?.
बंड्या : मास्तर, वाघाने मला खाल्ल्यावरच तुमचं समाधान होणार काय?


Guruji : बंड्या, Solar Energy पासून निर्मितीचं एखाद उदाहरण सांग बघू
Bandya : कुंतीपुत्र कर्ण (गुरुजी तेव्हापासून उन्हात बसलेत)


मान्याच्या वर्गात एकदा शाळा तपासणारे Inspector येतात. विज्ञानातील पुस्तकातल्या एका प्राण्याचे नुसतेच पाय दाखवून मन्याला तो प्राणी ओळखायला सांगतात.
मन्या : काय ओळखायला येत नाही सर
Inspector : मुर्खा, एवढं सोपं असूनही ओळखता येत नाही? नाव काय तुझं?
मन्या : माझे पाय बघा आणि तुम्हीच सांगा


Guruji : मुलांनो कीर्तन हा शब्दच इतका सुंदर आहे की चेहऱ्यावर अष्टसात्विक भाव उमटतात
Bandya : अन हा शब्द उलटा वाचला की कोणते भाव येतात गुरुजी?


Latest Bandya Guruji Jokes


Mastar : समजा मी मार्केट वरून १०० रुपये चे सात बांगडे आणले तर एक बांगडा कसा पडला?
Bandya : पण मास्तर तुम्ही फाटकी पिशवी Market ला नेताच कशाला?


Teacher : जो माझ्या प्रश्नाचे लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल
बंड्याने लगेच आपली Bag वर्गाबाहेर फेकली.
Teacher : ती Bag कोणी फेकली?
Bandya : मी, आता मी घरी जाऊ शकतो ना


गुरूजींनी : शिवीची व्याख्या सांगा
विद्यार्थी: खुप राग आल्यानंतर समोरच्याला शारीरिक दुखापत न करता मुखावाटे मानसिक इजा कारणेहेतू निवडलेल्या शब्दांचा समूह, जो उच्चारल्यानंतर अगाध शांतीची अनुभूती होते, तिला शिवी असे म्हणतात


आमचे शाळेतले मराठीचे शिक्षक एकदा माझ्या Office वर आले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या मग गाडी संसाराकडे वळली.
सरांनी मला विचारले “मुलं बाळ काय?”
मी म्हणालो, “हो, दोन आहेत… पहिलीला एक अन दुसरीला एक !”
मास्तर जागेवर बेशुद्ध… खरंच अवघड आहे मराठी भाषा समजण. कशीही वळते


गुरुजी : एक बाई एका तासात ५० पोळ्या बनवत असेल तर तीन बायका एका तासात किती पोळ्या बनवतील?
बंड्या : एकही नाही… कारण ती एकटी आहे म्हणून तर काम करते. तिघी जणी मिळून फक्त गप्पा मारतील


शिक्षक : मुलांनो पाण्यात काय विरघळते?
विद्यार्थी : डांबर
शिक्षक : काय, डांबर?
विद्यार्थी : हो सर, मुंबई मधील सर्व रस्त्यांवरील डांबर पावसाळ्यात पाण्यात विरघळते


मास्तर : गण्या मोठेपणी तू कोण होणार?
गण्या : मी खूप श्रीमंत होणार, माझ्याकडे बांगला, २-३ गाड्या, दिमतीला १० नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.
मास्तर : बस बस. आता पूजा तू सांग तू मोठेपणी कोण होणार?
पूजा : गाण्याची बायको


Bandya aani Master Jokes


शिक्षक : मुलांनो, सांगा पूर्वीचे मद्रास नाव असलेल्या शहराचे आत्ताचे नाव काय?
बंड्या : चेन्नई, सर
शिक्षक : अगदी बरोबर. आता मला सांग चेन्नई हे नाव कसे पडले?
बंड्या : सर, तिथले सर्व लोक लुंगी घालतात आणि लुंगीला चैन नसते म्हणून (चैन नही) चेन्नई हे नाव पडले


टीचर : आपले वडील काय करतात या विषयी थोडक्यात सांगा. पिंटू, सांग तुझे वडील काय करतात?
पिंटू : बाई आमचे रसाचे दुकान आहे.
टीचर : वा, मग आम्ही येऊ की रस प्यायला. कोण-कोणते रस आहेत पिंटू???
पिंटू : द्राक्षांचा कडू रस, गुळाचा आंबट काढा, वाफवलेले संत्री अर्क आणि भिजवलेल्या गव्हाचे सुगंधी सरबत.
टीचर : कसले रे हे रस??
मागून पोरं ओरडतात “बाई, पिंट्याच्या बापच देशी दारूचं दुकान आहे”


सर : चिन्या सांग पाऊस पडताना वीजा का चमकतात?
चिन्या : कारण देव बघतो की पाऊस कुठे कुठे पडला आणि कुठे पडायचा राहिलाय
सर भर पावसात पंढरपूर वारीला निघून गेले


शाळेत इंग्लिशचे लेक्चर चालू असते
गुरुजी : गण्या “it” केव्हा वापरतात?
गण्या : घर बांधताना


Mastar aani Ganya Jokes


गुरुजी : बंड्या पुढील वाक्याचा अर्थ सांग – “प्राचीन काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता”
बंड्या : याचा अर्थ त्या काळातही गोल्ड फ्लेक अस्तित्वात होती
गुरुजींनी शाळा सोडून सन्यास घेतलाय


शाळेतील सर्वात आवडीचा क्षण – जेव्हा चालू तासामध्ये सूचनेचे रजिस्टर यायचे आणि त्यात “… तरी या निमित्ताने उद्या शाळेला सुट्टी राहील” अशी सूचना असायची …! आणि सर्वजण खुश


गुरुजी : २५ भागिले ३ किती?
गण्या : ८
गुरुजी : आणि बाकी काय ?
गण्या : बाकी काय नाय, निवांत, तुमचं कसं काय? पगार बिगार वाढतोय का नाही?


Teacher Student Funny Jokes in Marathi


गुरुजी : काय समजले नसेल तर विचारा
बंड्या : गुरुजी, फळा पुसल्यावर फळ्यावरची अक्षरे कुठे जातात??


गुरुजी : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त का बाहेर येते?
बंड्या : सुई कोणी टोचली ते बघायला


गुरुजी : तुझी हजेरी कमी आहे. तू परीक्षेला नाही बसू शकत.
गाण्य : फिकीर नाही गुरुजी आपल्याला जराबी घमेंड नाही. मी उभ्यनेच पेपर लिहील


पेपर मध्ये प्रश्न होता : डोक्यावर पांघरून घेऊन का झोपू नये ?
एकाने उत्तर लिहिले : कारण कोण झोपलंय ते कळत नाही, म्हणून


गुरुजी : दिवाळीला रांगोळीच्या बाजूला पणती का लावतात ??
बंडू : रांगोळीला थंडी वाजू नये म्हणून


गुरुजी : दळणवळण म्हणजे काय ?
विद्यार्थी : एखादी मुलगी ‘दळण’ घेऊन जाताना ‘वळून’ पाहते त्याला दळणवळण म्हणतात


मास्तर : सांगा शून्या पेक्षा लहान संख्या कोणती आहे काय ?
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग बरे
मुलगा : टिंब


Marathi Teacher Student Jokes


टिचर : बंड्या तु वर्गात सारखा मुलिंशी गप्पा का मारत असतोस..?
बंड्या : बाई मी गरिब घरचा आहे, मला “What’s App” परवडत नाही.


एकदा एका शाळेंत डेप्युटी शाळा तपासायला आले. एका वर्गांत त्यांनी फळ्यावर ‘NATURE’ अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले :
हा काय शब्द आहे?
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला ” नटुरे”.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला. सर्व मुलांनी तेच सांगितले “नटुरे”.
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले : हा काय प्रकार आहे?
शिक्षक उत्तरले : पोरं अजून ‘मटुरे’ (mature) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड- मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले : जाऊ द्या हो साहेब !!! या गोष्टीचा त्यांच्या ‘फुटुरे’ (future ) वर कांहीच परिणाम होणार नाही


मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त राग कोणाचा येतो?
बंड्या : राजाराम मोहनरॉय
मास्तर : का रे बंड्या ?
बंड्या : कारण, त्यांनी ‘बालविवाह’ बंद केला. त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज आम्ही जोडीने शाळेत आलो असतो


वडील बंड्याला : बंड्या तु इतिहासामध्ये नापास का झाला?
बंड्या : अहो बाबा, सर्व प्रश्न त्या जमान्याचे होते जेव्हा माझा जन्मपण नव्हता झाला


मास्तर : कावळा सरळ का उडतो ?
गण्या : कारण तो विचार करतो की उगाचच “का – वळा”?


मास्तर : जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
बंड्या : फुल भाजी


Guruji Bandya Jokes


मास्तर : हॉटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाहीत?
गण्या : कारण तिकडे वाढायला वेटर्स असतात ना


मास्तर : हत्ती पाण्यात पडला तर काय होईल?
गण्या : हत्ती ओला होईल


मास्तर : रावणाच्या लंकेला ‘सोन्याची लंका” का म्हणतात ?
गण्या : कारण लहानपणी रावणाला लाडाने “सोन्या” म्हणायचे


 

Liked it? Share with your friends...

One thought on “Teacher Student Jokes in Marathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *