स्वप्नात साजणा येशील का?
चित्रात रंग हे भरशील का?
मी जीवन गाणे गावे
तू स्वरांत चिंब भिजावे
दोघांनी हरवून जावे
ही किमया नकळत करशील का?
ही धूंद प्रीतीची बाग
प्रणयाला आली जाग
रोमांचित गोरे अंग
विळख्यात रेशमी धरशील का?
प्रतिमेचे चुंबन घेता
जणू स्वर्गच येई हाता
मधुमीलन होता होता
देहात भरून तू उरशील का?
