Sukhache He Sukh Shrihari Mukh Abhang Lyrics in Marathi सुखाचें हें सुख श्रीहरि मुख । पाहतांही भूक तहान गेली ॥१॥ भेटली भेटली विठाई माउली । वासना निवाली जिवांतील ॥२॥ चंद्रासी चकोर मेघासी मयूर । वाटे तैसा भर आनंदाचा ॥३॥ नामा ह्मणे पाप आणि ताप दुख: गेलें । जाहलें हें सुख बोलवेना ॥४॥ – संत नामदेव