Sukhache He Naam Abhang Lyrics in Marathi

सुखाचें हें नाम आवडीनें गावें ।
वाचें आळवावें विठोबासी ॥१॥

संसार सुखाचा होईल निर्धार ।
नामाचा गजर सर्वकाळ ॥२॥

कामक्रोधांचें न चलेचि कांहीं ।
आशा मनशा पाहीं भूर होती ॥३॥

आवडी धरोनी वाचें ह्मणे हरि हरि ।
ह्मणतसे महारी चोखियाची ॥४॥

– संत सोयराबाई