Sukha Anupam Santanche Charni Abhang Lyrics in Marathi

सुख अनुपम संतांचे चरणीं
प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे ॥१॥

तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली
जेणें निगमावली प्रगट केली ॥२॥

संसारी आसक्त माया-मोह रत
ऐसे जे पतीत तारावया ॥३॥

चोखा म्हणे तेच ज्ञानदेवी ग्रंथ
वाचिता सनाथ जीव होती ॥४॥

– संत चोखामेळा