Soniyacha Divas Aaji Amrute Pahla Abhang Lyrics in Marathi सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला । नाम आठवितां रूपीं प्रकट पैं झाला ॥१॥ गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना । अणु न विसंबें हरी जगत्रयजीवना ॥२॥ तनु मनु शरण तुझ्या विनटलों पायीं । बाप रखुमादेवीवराविना आनु नेणें कांहीं ॥३॥ – संत ज्ञानेश्वर