Shur Aamhi Sardar Marathi Deshbhakti Songs Lyrics

शूर अम्ही सरदार अम्हाला काय कुणाची भीती ।
देव, देश अन्‌ धर्मापायी प्राण घेतलं हाती ।। धृ ।।

आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत
तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रीत
लाख संकटं झेलुन घेइल, अशी पहाडी छाती ।। १ ।।

जिंकावे वा कटुन मरावं, हेच अम्हाला ठावं
लढुन मरावं मरुन जगावं, हेच अम्हाला ठावं
देशापायी सारी विसरू, माया-ममता-नाती ।। २ ।।