वाटत नव्हते कोणासही ऐसे अघटित घडून येईल
चालता – बोलता तुला दैव ऐसें नेईल
माणुसकी, स्नेह, आधार, मायेची ज्या ज्या वेळी चर्चा होईल
त्या त्या वेळी सर्वांना पहिली आठवण तुझी येईल

साथ सुटली लाखमोलाची । छाया आटली वटवृक्षाची ।।
गेला आधारवड आमचा । हरवले गंध प्रेमाचे ।।
शांती लाभो तुमच्या आत्म्यास । हिच विनंती परमेश्वरास ।।
कष्टाने संसार थाटला पण राहिली नाही साथ आम्हाला,
आठवण येते प्रत्येक क्षणाला, आम्ही तुमची वाट पाहतो
यावे पुन्हा जन्माला

जशी वेळ निघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल
पण आयुष्यभर येणाऱ्या त्यांच्या आठवणींना कुठलीच तोड नाही
त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही गोड नाही

चंदनापरी देह झिजविला, कष्टातून वसंत फुलविला
उरली नाही साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला
आजही तुमची वाट पाहतो, यावे पुन्हा जन्माला …. !

ऑफीसात माझ्यापासून अगदी मोजल्यास चार हात लांब बसणारा माझ्याच वयाचा एक मित्र अनपेक्षितपणे वय नसतानाही गेल्याचं कळालं… कालच तो माझ्यासमोर होता… अरे आम्ही बोललो…अरे काल निघताना बोललोय मी त्याच्याशी….मीही बोललो…त्या सगळ्यांशी झालेल्या संवादात आम्ही सगळेच होतो… पण मुद्दलातला ‘तो’ च नव्हता…
आपण सगळेच या सगळ्यात असतो… कधी कधी नसतोही…. आपण मोजलं तर आपण सगळेच एकमेकांपासून या चार हातांपेक्षाही चार शब्दांनी लांब असतो.. नसतोही … प्रत्येकासोबतचा प्रत्येक क्षण जपा...
XXXXXX मित्रा तुझ्या आत्म्याला शांती लाभो…
-Sachin Shahaji Kakade
शून्यामधूनी विश्व् निर्मूनी, कीर्तीसुगंध वृक्ष फुलवूनी
लोभ, माया, प्रीती देवूनी सत्य सचोटी मार्ग दावूनी
अमर जाहला तुम्ही जीवनी

लोक म्हणतात की,” एक जन गेल्याने दुनिया संपत नाही किंवा थांबत नाही
पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाख लोक मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही
भावपूर्ण श्रद्धांजली
जे झाले ते खूप वाईट झाले. यावर विश्वासच बसत नाही. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखद घटनेतून सावरण्याची शक्ती देवो
खरोखर ही खूप वाईट घटना आहे. एवढ्या कमी वयात याचे जाणे खूपच दुःखदायक आहे. यांच्या परिवाराला यांची आठवण नेहमीच येत राहील. माझी विनम्र श्रांधजली
जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी निर्माण करून जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
बोट सुटले हातून जरी, सावली अजून खांद्यावरी,
वात्सल्याचा राहो सदा, आशिर्वाद आम्हांवरी!

आठवणींच्या गंधाने मन भरून येते, तुमची उणीव सदैव जाणवत राहील.
आपण आमच्यासोबत नसला तरी तुमचे विचार आणि प्रेम आम्हाला सदैव प्रेरणा देतील.
भावपूर्ण श्रद्धांजली!
धैर्याने आणि प्रेमाने आयुष्य जगणाऱ्या या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली
तुमचं असणं सर्वकाही होतं
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे

झाले बहु होतील बहु परि तुझ्या समान तूच
आठवण कायम येत राहील
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
काळाचा महिमा काळच जाणे,
कठीण तुझे अचानक जाणे,
आजही घुमतो स्वर तुझा कानी,
वाहताना श्रद्धांजली डोळ्यात येते पाणी

जग सोडून जाणे आपल्या हातात नाही
पण त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या आत्मशांतीसाठी मात्र आपण प्रार्थना करु शकतो
पुन्हा हातात हात घेऊन तुझ्यासोबत चालता येणार नाही
पण मला माहीत आहे तू कायम माझ्या सोबत असणार आहेस
सगळे म्हणतात की एक मित्र गेल्याने दुनिया संपत नाही
आणि ती थांबतहि नाही…
पण हे कोणालाच कसे समजत नाही की लाख मित्र असले तरी,
त्या एकाची कमी पूर्ण होत नाही…
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील
जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुझी आठवण येत राहील
तुमचं असणं सर्वकाही होतं.
आयुष्यातील एक ते सुंदर पर्व होतं.
आज सर्वकाही असल्याची जाणीव आहे
पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे
अंगणी वसंत फुलला,
उरली नाही साथ आम्हाला
आठवण येते क्षणाक्षणाला,
तुम्ही फिरुनी यावे जन्माला.
तुझे जाणे मला कायमचे दु:ख देऊन गेले
आता तुझ्या आठवणींचाच मला आधार आहे
मनी होता भोळेपणा, कधी न दाखवला मोठेपणा
चेहरा होता सदा हसमुख, दिला सर्वांना आनंद खुप
अजूनही होतो भास, तुम्ही आहात सभोवताली
XXXXX गेल्याची बातमी समजली,
खुप आठवणी डोळ्यासमोर आल्या
XXXXX विषयी लिहीणार काय?
अचानक झालेली तुझी एक्सिट मनाला पटली नाही यार
आज तुझ्या आठवणीने फार गहिवरुन येत आहे.
तुझी आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही..
💐भावपूर्ण श्रद्धांजली💐
आयुष्यात इतक्या लवकर आपली साथ सुटेल असे वाटले नव्हते.
नियतीने घात केला आणि तुझ्या शरीरातील आत्मा निघून गेला.
शरीराने तू गेलास तरी मनाने माझ्यासोबत राहशील ही अपेक्षा
ज्योत अनंतात विलीन झाली
स्मृती आठवणींना दाटून आली
भावी सुमनांची ओंजळ भरुनी वाहतो आम्ही
💐🙏🏻 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🏻
जाणारे आपल्यानंतर एक
अशी पोकळी निर्माण करून जातात
ती भरून काढणे कधीही शक्य नसते.
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो
अश्रू लपवण्याच्या नादात मी
मलाच दोष देत राहिलो
आणि या खोट्या प्रयत्नात
मी तुला आणखीच आठवत राहिलो
भावपूर्ण श्रद्धांजली
शोकांतिक प्रसंगात आपल्या भावना व्यक्त करणे कठीण असते, परंतु शोक व्यक्त करण्यासाठी आजच्या डिजिटल युगात WhatsApp मेसेजेस प्रभावी माध्यम ठरले आहेत. आपल्या प्रियजनांच्या आठवणींना श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली संदेश पाठवणे ही एक भावनिक आणि सन्माननीय प्रक्रिया आहे. ‘श्रद्धांजली WhatsApp Messages in Marathi’ या पेज वरून आपण आपल्या भावना मराठीतून अत्यंत संवेदनशीलपणे आणि आदरपूर्वक पोहोचवू शकता.
मृत्यू ही अपरिहार्य गोष्ट आहे, परंतु ज्या व्यक्ती आपल्या आयुष्यातील अनमोल क्षणांचे भागीदार होत्या, त्यांना श्रद्धांजली वाहणे हे आपल्या कर्तव्याचे प्रतीक आहे. मराठी श्रद्धांजली WhatsApp मेसेजेसच्या माध्यमातून आपण आपली शोकभावना, आठवणी आणि स्नेह व्यक्त करू शकता.
हे मेसेजेस WhatsApp वर सहज पाठवता येतील व आपल्या भावना योग्य शब्दांत व्यक्त होतील. अशा संवेदनशील प्रसंगी योग्य शब्दांची निवड अत्यंत महत्त्वाची असते. मराठी प्लॅनेट च्या या पेजवर आपण अधिक श्रद्धांजली संदेश वाचू शकता आणि त्यातून प्रेरणा घेऊ शकता.
