Savdhan Vanava Pet Ghet Aahe Song Lyrics in Marathi

सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे

काळोखाच्या साम्राज्याला तीट लावून भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जगणार नाय
उठ मराठ्या क्षितिज बघ तुला साद देत आहे
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे

मरहट्यांच्या नशीबी जरी दुहीची मेख आहे
फितुरांना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठिणगी हवी जी बस तुझ्यात आहे
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे

पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
प्रधान इथले मस्तवाल अन्‌ सुस्त जाहले मावळे
असो पहाडापरी शत्रू पण तू सुरूंग आहे
सावधान सावधान सावधान सावधान
वणवा पेट घेत आहे

गीत – अरविंद जगताप
संगीत – अवधूत गुप्‍ते
स्वर – अवधूत गुप्‍ते, स्वप्‍नील बांदोडकर
चित्रपट – झेंडा