Sasu Sun Jokes in Marathi

एका म्हातारीचा जावई खूपच काळा होता,
सासू – जावईबापू, तुम्ही एक महिना इथेच राहा
जावई – अरे वा सासूबाई, आज खूप प्रेम उतू चाललेय आमच्यासाठी
सासू – अरे प्रेम वगैरे काही नाही रे काळतोंड्या… आमच्या म्हशीचे पिल्लू मेलंय… तुला बघून कमीत कमी म्हैस दूध तरी देईल


सासू आणि सून यांचे पटत का नाही हे माहित आहे?
कारण नावातच खोड आहे
सा – सारख्या सूचना, सु – सूचना
सु – सूचना, न – नको


सासू – किती वेळा सांगितलंय बाहेर जाताना टिकली लावत जा
सुनबाई – आहो सासूबाई, जीन्स वर कोणी टिकली लावतं काय?
सासू – अंग जीन्स वर नाही कपाळावर लाव, भवाने


पत्रिका मुलाची आणि मुलीची नाही तर सासू सुनेची जुळली पाहिजे
संसार सुखाचाच होईल ! मुलगा तर कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो


Sasu Sun Jokes


सासूबाई – हे तुझ्या आईचे घर नाहीये, नीट राहायचं
सुनबाई – हे तुमच्यातरी कुठे आईचे घर आहे, तुम्हीपण नीट राहा


बाहुबली २ पाहीला आणि कळलं की कटप्पा वगैरे काही नाही, शेवटी सासु सुनेच्या भांडणात नवऱ्याचा विनाकारण बळी जातो
घरोघरी मातीच्या चुली । फुकटचा मेला बाहुबली।।


आताच दोन सासूंमधील संभाषण ऐकले… माझी नवीन सून म्हणजे अगदी हजाराची नोट आहे हो…
काही कामाची नाही…


पुणेरी सुनेचा मार्मिक टोला, “आमच्या सासूबाईंना ना “Heavy Diabetes” आहे. पण संयम बघा रक्तातली साखर कधीही ओठावर आली नाही”


Sasu Sun Tomne


सुनबाई : सासूबाई मी तुम्हाला मदत करू का?
सासूबाई : का गं??? नेट पॅक संपला वाटतं


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला जो लग्नासाठी तयार केलेला होता
त्यात आवड या सदरा मध्ये “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे” असे लिहीले होते
सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली – “भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे”


सखुबाई : तुझी सून कशी आहे?
बकुबाई : काय सांगू बाई, माझ्या पोराला बैल बनवलं आहे. माझा पोरगा तिच्यापुढे पाणी भरतो, घर झाडतो, चहा करून देतो आणि मग ती उठते
सखुबाई : आणि जावई कसा आहे?
बकुबाई : जावई देव माणूस आहे…. पाणी भरून देतो, झाडू मारतो, चहा करून देतो. माझी पोरगी सुखात आहे. जावई भलताच देव माणूस आहे


Sasubai Quotes in Marathi


नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते : आजपासून तू मला आई म्हणायचं आणि सासर्यांना बाबा म्हणायचं
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो तेव्हा ती म्हणते : आई, दादा आला.


सासूबाई : अगं सुनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे?
नवीन सुनबाई : मला मैत्रिणीने सांगितले, वाणासाठी जर कोणाला ५ फळं मिळाली नाहीत तर त्यांनी पूजेसाठी मिक्स जॅम वापरला तरी चालतो
सासूबाई चक्कर येऊन पडल्या… पूजा वही, सोच नायी


सुनबाई पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते
सासूबाई : काय गं, फ्रिज मध्ये देवघरातील घंटा का ठेवली?
सुनबाई : पुस्तकात लिहिलंय “इन सब का मिश्रण बनाकर फ्रिज में एक घंटा रखिये”
ससु कायमची वारीला निघून गेली


सुनबाई : सासूबाई मी तुम्हाला मदत करु?
सासूबाई : का गं, नेट पँक संपला वाटत?


सासूबाई : देवाने तुला चांगले २ डोळे दिलेत ना? तांदुळातले २-४ खडे सुद्धा काढता नाही येत काय तुला?
सुनबाई : देवाने तुम्हाला चांगले ३२ दात दिलेत ना… मग तुम्हाला खाताना २-४ खडे खाता येत नाही का??


सासू–सून जोक्सचा धमाल संग्रह

मराठी घरांमध्ये सासू–सून हे नातं जितकं जिव्हाळ्याचं, तितकंच ते कधी कधी हसवणाऱ्या चिमटे आणि टोमण्यांनी भरलेलं असतं. दोघींच्या नात्यात थोडं जिव्हाळा, थोडी छेडछाड आणि खूप सारी मजा लपलेली असते. म्हणूनच Sasu Sun Jokes हे विनोदांचे जग कायमच रंगतदार बनवत आले आहेत. छोट्या-छोट्या प्रसंगातून उभा राहिलेला हलकाफुलका विनोद कोणाचाही मूड लगेच फ्रेश करतो.

या पानावर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत सासू-सून जोक्सचा निवडक, स्वच्छ आणि पूर्णपणे मौलिक संग्रह. हे जोक्स कुटुंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत वाचण्यासाठी आणि WhatsApp, Facebook, Instagram वर शेअर करण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत.