Santbhar Pandharit Kirtanacha Gajar Abhang Lyrics in Marathi

संतभार पंढरींत ।
कीर्तनाचा गजर होत ॥१॥

तेथें असे देव उभा ।
जैसी समचरणांची शोभा ॥२॥

रंग भरे कीर्तनांत ।
प्रेमें हरिदास नाचत ॥३॥

सखा विरळा ज्ञानेश्वर ।
नामयाचा जो जिव्हार ॥४॥

ऐशा संतां शरण जावें ।
जनी ह्मणे त्याला ध्यावें ॥५॥

– संत जनाबाई