Santa Banta Jokes in Marathi

संता, बंता आणि गुरमीत स्कूटरवरून सुसाट वेगाने जात असतात. अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते. ट्रॅफिक पोलिस शिट्टी वाजवून थांबण्याचा इशारा करतो.
बंता त्याला म्हणतो आधीच तिघे बसलोत. आता तू कुठे बसणार?


Santa एका हॉस्पिटल मधील नर्सच्या प्रेमात पडला. खूप विचार करून त्यांनी नर्सला प्रपोज केला, “I Love You, Sister”


Santa : काल मला १० जणांनी खूप खूप मारला
Banta : काय बोलतोस, मग तू काय केलास?
Santa : मी म्हटलं, दम असेल तर एक एक जण या मग बघतो
Banta : मग काय झालं?
Santa : मग काय, साल्यांनी परत एकेकाने येऊन मारलं


सांता एका साधूला : बाबा माझी बायको मला खूप हैराण करते, काही तरी उपाय सांगा
साधु : बेटा, जर उपाय असता तर मी साधू का बनलो असतो?


संताला एकाने विचारले : Ford काय आहे?
Santa : गाडी आहे
त्याने परत विचारले : Oxford काय आहे मग?
Santa : बैलगाडी

 


🕺 Santa Banta Marathi Jokes

मनोरंजनाच्या जगात सांता-बंता जोक्स हे नेहमीच लोकप्रिय राहिले आहेत. हलका फुलका विनोद, साधंसरळ कथानक आणि शेवटी येणारा भन्नाट ट्विस्ट यामुळे हे जोक्स प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणतात. कामाचा ताण, ऑफिसची धावपळ किंवा घरातील रोजची गडबड– अशा कोणत्याही परिस्थितीत हे जोक्स मन ताजेतवाने करण्यासाठी परफेक्ट आहेत. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास Santa Banta Jokes in Marathi चा धमाल संग्रह!

या पेजवर तुम्हाला मिळतील मजेदार, कुटुंबसुलभ, आणि सोशल मीडियावर शेअर करण्यास योग्य असे सर्वोत्तम मराठी सांता-बंता जोक्स. तुमचा WhatsApp ग्रुप, Instagram स्टोरी किंवा Facebook टाइमलाइन कुठेही हे जोक्स लगेच वातावरण मस्त बनवून टाकतात.