Sang Na Re Mana Song Lyrics in Marathi

अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे
आणि धुंदावती भाबडी लोचने
होतसे जीव का घाबरा सांग ना,
सांग ना रे मना !

श्वास गंधाळती शब्द भांबावती
रोमरोमांतली कंपने बोलती
मोहरे मोहरे पाकळी पाकळी
भारलेल्या जीवा आवरावे किती
का अशा जागल्या सांग संवेदना,
सांग ना रे मना !

हे नवे भास अन्‌ ह्या नव्या चाहुली
ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली
गोठले श्वास अन्‌ स्पंदने थांबली
हे शहारे जणू रेशमाच्या झुली
आज ओथंबल्या का अशा भावना,
सांग ना रे मना !

गीत – गुरु ठाकूर
संगीत – अवधूत गुप्‍ते
स्वर – स्वप्‍नील बांदोडकर, निहिरा जोशी-देशपांडे
चित्रपट – झेंडा