Sagun Sampanna Pandharichya Raya Abhang Lyrics in Marathi सगुण संपन्न पंढरीच्या राया । आमुच्या स्वामिया केशिराजा ॥१॥ रामकृष्ण हरी श्रीधरा मुकुंदा । सज्जनीं स्वानंदा सर्वातीता ॥२॥ गोविंद गोपाळ गोपवेषधारी । गोवर्धन धरी नखावरी ॥३॥ दुष्ट दुर्जनासी दु:ख फार चित्तां । पावन पतितां नामा ह्मणे ॥४॥ – संत नामदेव