Roop Pahata Lochani Abhang Lyrics in Marathi रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥१॥ तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥ बहुतां सुकृतांची जोडी । म्हणुनी विठ्ठलीं आवडी ॥३॥ सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू ॥४॥ – संत ज्ञानेश्वर