Ratrichya Dhund Samayala Song Lyrics in Marathi

रात्रीच्या धुंद समयाला
शिणगार साज मी केला
हो सख्या घडीभर बसुनी बोला

हृदयाची कळी जागली
शिणविली नयनबाहुली
वाट बघुन जीव हा थकला

ओठांत भाव थरकले
घुंगरू छनन वाजले
बांधला सुरांचा झोला

तबकात विड्यांचा थाट
केशरी गंध वार्‍यात
प्रणयास आगळा थाट
चौरंग बाहुचा केला

गीत – यशवंत देव
संगीत – यशवंत देव
स्वर – आशा भोसले
चित्रपट – कामापुरता मामा