Raja Lalkari Ashi Ghe Song Lyrics in Marathi

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

कुंकवाचा माझा धनी
बळ वाघाचं आलंया
भरलेल्या मोटंवानी
मन भरून गेलंया

ओढ फुलाला वाऱ्याची
जशी खूण इशाऱ्याची
माझ्या सजनाला कळू दे
हाक दिली साद मला दे

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

सूर भेटला सूराला
गाणं आलं तालावर
खुळ्या आनंदाचं माझ्या
हसू तुझ्या गालावर

भरजरीचा हिरवा
शेला पांघरून नवा
शिवार हे सारं फुलू दे
हाक दिली साद मला दे

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

थेंब नव्हं हे घामाचं
त्याचं बनतील मोती
घास देईल सुखाचा
लई मायाळू ही माती

न्याहारीच्या वखुताला
घडीभर ईसाव्याला
सावली ही संग मिळू दे
हाक दिली साद मला दे

राजा ललकारी अशी घे
हाक दिली साद मला दे

चित्रपट : अरे संसार संसार (१९८१)
गीतकार :जगदीश खेबुडकर
संगीतकार:अनिल-अरुण
गायक : अनुराधा पौडवाल-सुरेश वाडकर