Paule Chalati Pandharichi Vaat Marathi Bhakti Geet Lyrics

पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनिया गाठ

गांजुनिया भारी दुःख दारिद्र्याने
पडता रिकामे भाकरीचे ताट

आप्‍तइष्ट सारे सगेसोयरे ते
पाहुनिया सारे फिरविती पाठ

घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा
अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट

मन शांत होता पुन्हा लागे ओढ
तैसा आणि गोड संसाराचा थाट

गीत – दत्ता पाटील
संगीत – मधुकर पाठक
स्वर – प्रल्हाद शिंदे