Pandhariche Sukha Nahi Tribhuvni Abhang Lyrics in Marathi पंढरीचे सुख नाहीं त्रिभुवनीं प्रत्यक्ष चक्रपाणि उभा असे ॥१॥ त्रिभुवनीं समर्थ ऐसें पैं तीर्थ दक्षिण मुख वाहात चंद्रभागा ॥२॥ सकळ संतांचा मुकुटमणी देखा पुंडलीक सखा आहे जेथें ॥३॥ चोखा म्हणे तेथें सुखाची मिराशी भोळ्या भाविकांसी अखंडित ॥४॥ – संत चोखामेळा