Pandharicha Vaas Chandrabhage Snan Abhang Lyrics in Marathi

पंढरीचा वास चंद्रभागे स्‍नान
आणिक दर्शन विठोबाचें ॥१॥

हेंचि घडो मज जन्म जन्मांतरी
मागणें श्रीहरी नाहीं दुजें ॥२॥

मुखीं नाम सदा संतांचें दर्शन
जनीं जनार्दन ऐसा भाव ॥३॥

नामा म्हणे तुझें नित्य महाद्वारीं
कीर्तन गजरीं सप्रेमाचे ॥४॥

– संत नामदेव