Pandharicha Raja Ubha Abhang Lyrics in Marathi पंढरीचा राजा उभा भक्तकाजा । उभारूनि भुजा वाट पाहे ॥१॥ घ्यारे नाम सुखें प्रेमें अलौकिक । साधनें आणिक करुं नका ॥२॥ मनाचेनि मनें ह्रदयीं मज धरा । वाचेनें उच्चारा नाम माझें ॥३॥ बोलोनियां ऐसे उभा भीमातीरीं । नामा निरंतरीं चरणापाशीं ॥४॥ – संत नामदेव