Pandhari Nivasa Sakhya Panduranga Abhang Lyrics in Marathi पंढरीनिवासा सख्या पांडुरंगा । करी अंगसंगा भक्ताचिया ॥१॥ भक्त कैवारिया होसी नारायणा । बोलतां वचन काय लाज ॥२॥ मागें बहुतांचें फेडियलें ऋण । आह्मांसाठीं कोण आली धाड ॥३॥ वारंवार तुज लाज नाहीं देवा । बोलरे केशवा ह्मणे नामा ॥४॥ – संत नामदेव