Pahu Dya Re Maj Vithobache Mukh Abhang Lyrics in Marathi पाहूं द्या रे मज विठोबाचें मुख लागलीसे भूक डोळां माझ्या ॥ कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटीं अंगीं बरवी उटी गोपाळाच्या ॥ जाईजुई पुष्पें गुंफुनियां माळां घालूं घननीळा आवडीनें ॥ नामा ह्मणे विठो पंढरीचा राणा डोळिंयां पारण होत असे ॥ – संत नामदेव