पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला…
का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी
सांगतो गुपित गोष्ट स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला…
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले, पाहिले न मी तुला…