Padile Durdeshi Maj Aathave Manasi Abhang Lyrics in Marathi पडिलें दूरदेशीं मज आठवे मानसीं । नको नको हा वियोग कष्ट होताती जिवासि ॥१॥ दिनु तैसी रजनी मज जाली गे माये । अवस्था लावुनि गेला अझुनीं कां न ये ॥२॥ गरुडवाहना, गंभिरा येईं गा दातारा । बाप रखुमादेविवरा श्रीविठ्ठला ॥३॥ – संत ज्ञानेश्वर