निरोप तुझा घेताना लागे ठेच मनी
तुझे रूप तुझा संग जागे मग लोचनी
निरोप तुझा घेताना बघते मागे वळूनी
डोळ्यातील मोती मनाचे अंगण जाते मग भरुनी
निरोप तुझा घेताना मिटते मी पापणी
अंधार हि येई तेव्हा चेहरा तुझाच घेउनी
निरोप तुझा घेताना पाऊस गातो गाणे
चातकाप्रमाणे मीही मग तुझ्या आठवणीत न्हाते
View All Nirop Marathi Kavita