Navra Bayko Jokes

Husband and wife relationship is very close relationship in the world. This relation have a unique bonding, love and care for each one. Even husband and wife exchange gifts on special occasion to strengthen their relationship. However, there are some couples who are not made for each other. Such relationship create jokes. Here are some of them, enjoy!

अर्ध्या तासापासून बायको मोबाइल कॅमेऱ्याला रुमालाने साफ करत होती. सेल्फी काढायची आणि डिलीट करायची
बाजूला नवरा लॅपटॉप वर काम करत होता
शेवटी त्याला राहवले नाही आणि बोलला, “जरा रुमाल चेहृयावर फिरवून ट्राय कर”
लॅपटॉप फुटला


पावसामुळे मुंबईची परिस्तिथी खूप बेकार झाली आणि अशा वेळी बायकोने नवऱ्याला फोने केला
बायको : जिथे असशील तिथे थांब. कुठेही बाहेर पडू नकोस. यावेळी तरी सांगितलेलं ऐक.
नवरा : बरं
बायको : बरं, नक्की कुठे आहेस तू आता?
नवरा : माझ्या मैत्रिणीच्या घरी
एकदम सन्नाटा (दुसऱ्या सेकंदाला)
बायको : जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब. पावसाची करणं मला सांगू नकोस


बायकोला तिचे निर्णय चुकतात असं सांगू नका… तिने तुमच्याशी लग्न केलंय हे लक्षात ठेवा!


बायको : आहो ऐकले का?
नवरा : काय?
बायको : या वर्षी हळदी कुंकूला मी बायकांना काय देऊ?
नवरा: माझा नंबर दे
लय धुतला बायकोने त्याला


नवरा : (कौतुकाने) लहानपणी आषाढीला मला शाळेत नेहमी विठोबा चा रोल देत असत
बायको : बाकी सर्व मुलं गोरी असतील ना


फटाके वाजतात म्हणून शेजारणीची मांजर आमच्याकडे झोपायला आलीय. मनात विचार आला की शेजारणीला फटाक्यांची भीती वाटत नसेल का?
अचानक बायकोच बोलली : तीच फटाकडी आहे. ती कशाला घाबरेल?


Husband Wife Jokes in Marathi


जोपर्यंत मुली त्यांच्या माहेरी असता तोपर्यंत त्या “राणी” सारख्या असतात.
जेव्हा त्या लग्न होवून सासरी जातात तेव्हा त्यांना “लक्ष्मी” म्हणतात.
आणि सासरी काम करता करता त्या “बाई” होतात. अश्या प्रकारे मूली राणी-लक्ष्मी-बाई होवून जातात
आणि नंतर आयुष्य भर इंग्रज समजून नवऱ्याशी लढत असतात, मग नवरा इंग्रज नसताना इंग्रजी सुरू करतो


बायको (फोनवर) : अहो, मी आता खरेदीला बाजारात आलेय. तुम्हाला काही हवंय का ?
नवरा : हो…. मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे. जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय. आत्म्याची शांती हवीय.
मला आत्म्याचा परमात्म्याशी संवाद करायचाय. त्यातून मला माझे अस्तित्व शोधायचे आहे आणि मोक्षाचा नेमका आनंद हवा आहे
बायको (शांतपणे) : ब्लेंडर्स प्राईड की सिग्नेचर?


मुलगा : बाबा मला शाळेच्या नाटकात रोल मिळाला आहे
बाबा : कोणता रोल आहे.
मुलगा : नवऱ्याचा
बाबा : अरे गाढवा, डायलॉग असणारा रोल माग


वटपोर्णिमेबद्दल वडाची झाडं भयंकर संतापली आहेत ….
त्यांचे म्हणणं आहे, “सात जन्मी हाच नवरा पाहिजे तर नव-याला बांधून ठेवा ना, आम्हाला का बांधून ठेवतात ???”


बायको : तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?
नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो
बायको (रागात) : हे काय?
नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।
नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे


पुरुषांचं आयुष्य सुखी असण्याची ७ कारणं..
१. त्यांचं आडनाव आयुष्यभर एकच असतं.
२. त्याचं फोनवरचं संभाषण ३० सेकंदात संपतं.
३. ५/६ दिवसांच्या सहलीसाठी त्यांना एक जीन्स पुरेशी असते.
४. कोणी त्यांना आमंत्रण द्यायला विसरलं तरीही त्यांची मैत्री टिकून राहते.
५. आयुष्यभरासाठी त्यांची एकच hair style टिकून राहते.
६. २५ नातेवाईकांसाठी खरेदी करायची असेल तर त्यांना २५ मिनिटे पुरतात.
७. एखाद्या पार्टीला गेल्यावर दुसऱ्या माणसाने सेम शर्ट घातलेला बघून त्यांना मत्सर वाटत नाही उलट ते त्या पार्टीत चांगले मित्र बनून जास्त एन्जॉय करतात
थोडक्यात काय तर …… पुरुष हे बटाटया प्रमाणे असतात कोणत्याही भाजी बरोबर एडजेस्ट होतात.


Marathi Navra Bayko Jokes


भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग – पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे
पण तिला काय माहित की आपला गंगाधरच शक्तिमान आहे


लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी नवरा नवीन नवरीशी भांडायला लागला. आजूबाजूचे लोक जमा झाले, आणि भांडण सोडवून त्याला विचारलं, ‘का रे का भांडत आहेस ?’
नवरा रागाने लालबूंद होऊन सांगू लागला, ” हि भवानी माझ्या चहा मध्ये तांत्रिक बाबा ने दिलेले ‘तावीज’ टाकून मला वश मध्ये करत होती. माझ्या आई पासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा”
तेवढ्यात बायको ओरडून म्हणाली, ” तावीज नाही रे नरसाळ्या, Tea Bag आहे ती! गावठी कुठला”


रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला. नवरा गडबडीत उठला. बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता, “ब्युटीफुल”
नवर्याने रागाने बायकोला उठवुन विचारले, “तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय?”
बायको पण चक्रावली आता ४० च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला??
जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली, “चष्मा लावून मोबाईल उचलत जावा “बॅटरी फुल” लिहिले आहे”


बायको सोबत काल झालेल्या शाब्दीक चकमकी नंतर असं वाटतं की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे
ज्या 300 शब्द प्रति मिनिटं बोलल्या नंतर म्हणतात की – माझं तोंड उघडायला नका लावू


लग्नाच्या पुजेवेळी
नवरा : गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायच की उजवीकडे?
गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे


चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देवमाणूस, जो कधी चुकतच नाहि तो बायकोच्या माहेरचा माणूस


जन्म झाल्यावर जेव्हा आई डोक्यावरून हाथ फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावर केस यायला सुरवात होते
आणि लग्न झाल्यावर जेव्हा बायको डोक्यावर हाथ फिरवते तेव्हा केस गळायला सुरवात होते…
प्रभू तेरी माया कोई समज नही पाया… कही धूप कही छाया


बायको : चला आज आपण बाहेर जेवायला जाऊ
नवरा : (शिक्षक) ओके, एखाद्या जवळच्या स्वस्त हॉटेल मध्ये जाऊ
बायको : नको Five Star हॉटेल मध्ये न्या ना आज
नवरा : (विचार करून) ठीक आहे, ७ वाजता जाऊ आपण
वाटेत जात जाता
नवरा : एकदा माझी आणि माझ्या बहिणीची पाणीपुरी खायची शर्यत लागली होती आणि तिने मला ३० पाणीपुरी एका वेळी खाऊन हरवले होते
बायको : त्यात एवढे अवघड काय आहे?
नवरा : मला पाणीपुरीच्या शर्यतीत हरवणे अवघड आहे
बायको : मी सहज तुम्हाला हरवू शकते
नवरा : सोड ना तुला हे शक्य नाही
बायको : चला आताच फैसला होऊ द्या
नवरा : म्हणजे तुला हरण्याची इच्छा आहे का??
बायको : बघू कोण हरतंय ते
दोघे पाणीपुरीच्या दुकानात जातात आणि पाणीपुरी खायला सुरवात करतात. ३० पाणीपुरी खाल्यानंतर नवरा म्हणतो बस आता मी थांबतो. त्याच्या बायकोचे पण पोट भरलेले असते पण त्याला हरवण्यासाठी ती अजून एक पाणीपुरी खाते आणि म्हणते, “मी जिंकले”
५० रुपये बिल होते. बायको जिंकल्याच्या आनंदात घरी परत येते
(जोक समजला ना???)


पत्नी : कल डॉकटर सांगत होते माझा बी. पी. वाढलाय. बी. पी. म्हणजे काय हो?
पती : बावळटपणा


बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचे व्रत करण्याऐवजी मौनव्रत केल्यास पती २५ वर्ष जास्त जगू शकतो


Marathi Husband Wife Jokes


बायकोने तिच्या नवऱ्याला विचारलं, “तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो?”
नवऱ्याने त्याच्या डोळ्यातील एक थेंब काढून समुद्राच्या पाण्यात टाकला आणि बोलला, “हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तू शोधून काढत नाही तो पर्यंत प्रेम करणार.”
हे पाहून बिचाऱ्या समुद्राला पण रडू आलं आणि तो बोलला, “कुठून शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला????”


अल्पकथा : खाया पिया कूच नाही ग्लास तोडा बारा आणा
चहा पिऊन झाल्यावर कधी नाही ते बायकोला मदत म्हणून मन्या चहाचा काप किचनच्या सिंकमध्ये ठेवायला गेला. मन्या आणि शेजाऱ्यांचे किचन एकदम समोरासमोर आहे. शेजारीण घरातील जुनी चाळणी सिंकमध्ये धूत होती बहुदा… चाळणीच्या छिद्रांमधील कचरा नीट साफ झालाय का हे पाहायला त्या सुंदर शेजारणीने चाळणी वर उचलून नजरेसमोर धरली. ती नक्की काय करत आहे हे अगदी निरागसपणे मन्या पहात असताना मन्याची बायको नेमकी किचनमध्ये डोकावली …. ऐन दिवाळीच्या तोंडावर मन्या आता हॉस्पिटल मध्ये आहे


नवीन प्रयोग – बायकोला म्हाळसा या नावाने हाक मारा
बायको हसली तर बानू च्या तयारीला लागा
टीप – या प्रयोगात बायकोचा मर खावा लागला तर आम्ही जबाबदार नाही


बायको घरी नसली की घर खायला उठतं
मग मी प्यायला बसतो – एक नवरा


मी जेवायला बसणार होतो तेवढ्यात बायको मला म्हणाली, “मी पण बसू काय तुमच्या ताटात?”
मी गमतीने म्हणालो…. “मावशीला का?”
अन उपवास घडला ना राव


हॉटेलमध्ये जेवून झाल्यावर बायको नवऱ्याला बोलते, “आहो वेटरला टीप तर द्या”
नवरा वेटरला : आयुष्यात कधी लग्न करू नकोस


सर्वात छोटा जोक
नवरा : मला कविता आवडते
बायको : मलापण विनोद आवडतो


एक नवरा साधूकडे जातो
नवरा : बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे  दिसतात,काय करू?
साधू : आरे password ताक मोबाईलला तुझ्या, येड्या तुझा मोबाईल चेक करते ती


बायको : देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे
नवरा : अरे वा, इतका आवडतो मी तुला?
बायको : तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार?


बायको : मला बोलायचीही इच्छा नाही, तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला… असं होतंच कसं???
नवरा : तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला? तुझे वय वाढलंय असं वाटतच नाही
बायको : खरंच ??
नवरा : (मनात) टायमावर डायलॉग आठवला, नाहीतर काही खरं नव्हतं आज


बायको : कशी दिसते मी?
नवरा : एकदम Piyanka Chopra सारखी दिसतेस
बायको : खरंच? DON वली कि KRISH वाली?
नवरा : BURFI वाली
मग काय, बायको ने धुतला MARY KOM बनून


परदेशी नवरे बायकोने केलेला स्वयंपाक काट्याने खातात
भारतीय नवरे मुकाट्याने


बायकोने भली मोठी रांगोळी काढली आणि विचारले, “कशी दिसतेय रांगोळी?”
रांगोळी नेमकी बदकाची होती का मोराची हे कळतच नव्हतं म्हणून हुशारीने म्हणालो, “काय सुंदर पक्षी रंगवला आहे.”
तर बायको भडकली नी म्हणाली, “हत्ती आहे तो … ”
हात्तिच्यामारी


वेगवेगळ्या क्षेत्रातील पुरुषांच्या बायका नवरयाबरोबर भांडताना काय उदगार काढतील?
पायलटची बायको, “गेलास उडत.”
मंत्र्याची बायको, “पुरे झाली तुमची आश्वासनं.”
शिक्षकाची बायको, “मला नका शिकवू.”
रंगारयाची बायको, “थोबाड रंगवीन.”
धोब्याची बायको, “चांगली धुलाइ करीन.”
सुताराची बायको, “ठोकुन सरळ करीन.”
तेल विक्रेत्याची बायको, “गेलात तेल लावत.”
न्हाव्याची बायको, “केसाने गळा कापलात की हो माझा.”
डेंटिसची बायको, “दात तोडुन हातात देइन.”
शिंप्याची बायको, “मल शिवलंस तर याद राख.”
अभिनेत्याची बायको …”कशाला नाटक करता?”
वाण्याची बायको …”नुसत्या पुड्या सोडु नका.”
वकिलाची बायको… “माझ्याशी खोटं बोललास तर याद राखा.”
गाय़काची बायको … “पुरे झालं रडगाणं.”


बायको निर्माण करताना देवाने सांगितले की, “चांगली आणि समजूतदार बायको जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात भेटेल”
त्यानंतर देवाने जग गोल बनवले… आता बसा बोंबलत आणि जगाचा कोपरा शोधत


मित्राची बायको : आहो भावोजी, मी गेले महिनाभर बघते आहे हे सकाळी अगदी वेळेवर तयार होऊन ऑफिसला जातात, एकही दांडी नाही पूर्वीसारखी. लेट थांबावं लागलं तरी काही तक्रार करत नाहीत
मित्र : वाहिनी, कामावर श्रद्धा असली कि असं होणारच
मित्राची बायको : मग याआधी नव्हती का कामावर श्रद्धा?
मित्र : नाही ना, मागच्याच महिन्यात जॉईन झाली ती, रिसेप्निस्ट म्हणून…


Husband and Wife Jokes in Marathi


बायकोच्या छळाला वैतागलेला नवरा शेवटी आयुष्य संपवायला तिसऱ्या मजल्याच्या कठड्यावर उभा राहतो. उडी मारणार इतक्यात बायकोचा आवाज येतो, “आहो ऐकलंत का, माझ्या मैत्रिणी आल्या आहेत, जरा येत का? ओळख करून देते.”
नवरा : हो, हो, आलोच


हॅलो, ऍम्ब्युलन्स का?
हो, बोला मॅडम, कुठे पाठवायची ऍम्ब्युलन्स ला? काय झालं?
माझ्या साडीवर कॉफी सांडली
बापरे, खूप भजलाय का?
नाही, मी ठीक आहे, माझा नवरा हसला माझ्यावर
समजलं मॅडम, पाठवतो ऍम्ब्युलन्सला


बायको : माझी मैत्रीण येणार आहे. दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.
नवरा : ठीक आहे पण तू पण वाचन दे “माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील”


नवरा : आज तुझा उपवास आहे?
बायको : हो
नवरा : काही खाल्लं का ?
बायको : होय
नवरा : काय ?
बायको : खिचडी, सफरचंद,डाळिंब ,शेंगदाणे, केळी, साबूदाण्याची खीर, बटाट्याचे वेफर्स, साबूदाण्याचे पापड, राजगीरीचे लाडू, सकाळी सकाळी चहा घेतला आणि आता ज्युस पीत आहे
नवरा : खूपच कडक उपवास आहे ग. सगळ्यांना जमत नाही हे. अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे.. नाहीतर उपवासाने चक्कर येईल


नवरा : आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय!.
बायको : मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडलीये, सांगितलं होतं ना जास्त आणायला


नवरा बायकोचे कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता. अत्यावश्यक गोष्टींबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई.
एकदा नवर्याला पहाटे गावाला जायचे असल्याने त्याने चिठ्ठी लिहून ठेवली, मला साडेचारला उठव.
सकाळी उठून पाहतो तो साडेसात वाजलेले होते. संतापून तो बायकोला ओरडणार, तेवढ्यात बायकोने पलंगा कड़े बोट दाखवले.
पलंगावर चिठ्ठी होती, त्यात लिहले होते की साडेचार वाजले उठा…


बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो. सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते. गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.
मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं….. त्याच्या बायकोची बस चुकली होती


नवरा बायको बसमध्ये चढतात.
बायको : दीड तिकीट द्या.
कंडक्टर : दीड कोणाचे?
बायको : माझं एक फुल आणि आमचे हे हाफ मॅड असल्याने याचं आर्ध तिकीट
कंडक्टर – तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटे घ्यावी लागतील.
बायको – का?
कंडक्टर – तुमचे पती हाफ मॅड म्हणून अर्ध. आणि तुम्ही दीड शहाण्या… असे दोन फुल


एका माणसाला संध्याकाळी कामावरुन घरी जाताना रस्त्यात फॅमिली डॉक्टर भेटतात.
डॉक्टर : काय म्हणताय? डोकेदुखी कशी आहे आता?
माणूस : माहेरी गेलीय गणपतीसाठी


पती : तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन ऑप्शन्स आहेत म्हणून, इथं तर एकच भाजी दिसतेय
पत्नी : ऑप्शन्स दोनच आहेत
१. खायचं असेल तर खा
२. नाहीतर बोंबलत जा


बायको : आहो ऐकलं का? मी काय म्हणतेय? नवरा जर मेला तर त्याला स्वर्गात गेल्यानंतर म्हणे अप्सरा मिळतात… हे खरे आहे का?
नवरा : हो तर
बायको : आणि बायको मारून स्वर्गात गेली तर तिला कोण भेटते?
नवरा : बायकोला ना? बायकोला तिथे माकडं भेटतात
बायको : जाळलं मेलं जिणं ते… असं कसं बायकांचं नशीब? इथं बी माकड आन तिथं बी माकडच


डॉक्टर : आता तुमच्या बायकोची तब्ब्येत कशी आहे?
नवरा : बरं वाटतंय तिला आता, आज सकाळीच भांडली माझ्याशी


माझा एक मित्र काल सुजलेल्या चेहऱ्याने सांगत होता – संध्याकाळी बायकोने त्याला खूप म्हणजे खूपच धुतला. कारण अगदी साधेच होते…
त्याने उदबत्ती लावताना फक्त एवढेच म्हटले – “घरातील पीडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येतो, घरच्या धान्याला उदंड आयुष्य लाभो !”


प्रश्न – प्रेम लग्नाआधी करावे का लग्नानंतर?
उत्तर – कधीही करा, फक्त बायकोला सांगू नका


फक्त घरातल्या बायकांसाठी
पूर्ण दिवस किचन मध्ये एका पायावर उभे राहून काम करा तरी कोणी नाही पाहणार. घरातील सर्व काम पूर्ण करा तरी कोणी नाही पाहणार. काम करताना कितीही थकला तरी कोणी नाही पाहणार…
पण ज्यावेळी मोबाइल हातात घेतला रे घेतला तेव्हा घरातले सर्व लोक रागाने बघतील


नवरा : साजणी, तुझ्या केसांच्या मखमली जाळ्याला सांभाळत जा गं जरा
बायको : लाजत… तुम्ही पण ना… इश्य
नवरा : आईशप्पथ जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला


बायको आकाशात चांदणी बघून म्हणते, “अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही?”
नवरा : शेजारीण …. बायकोने घरात नेऊन लई चोपला


Husband Wife Marathi Jokes


पत्नी : जर मी अचानक मारून गेली तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?
पती : नो डार्लिंग, तसा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही
पत्नी : का नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी ना. प्लिज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा, तुम्हाला माझी शपथ डार्लिंग.
पती : ओह, मेल्यानंतर पण माझी एवढी काळजी??
पत्नी : तर प्रॉमिस, तुम्ही दुसरे लग्न कराल ना?
पती : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी दुसरे लग्न कारेन
पत्नी : तुम्ही तुमच्या नवीन पत्नीला या घरात ठेवाल ना?
पती : हो, पण मी तिला तुझी रूम नाही देणार वापरायला
पत्नी : तिला आपली कार चालवायला द्याल ना?
पती : नो, नेव्हर, त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत. तुझी आठवण म्हणून मी कायम माझ्याजवळ ठेवील ती कार. तिला नवीन कार घेऊन देईल
पत्नी : आणि माझे दागिने?
पती : ते मी कसे देईल तिला? त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तिला नवीन दागिने बनवून देईन
पत्नी : आणि तिने माझ्या चप्पल वापरल्या तर???
पती : नाही वापरू शकणार ती. तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची ९
भयाण शांतता….. (चप्पल तुटेपर्यंत हाणला नवऱ्याला)


बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा …
काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायकोला घेऊन धरणावर फिरायला गेलो. मस्त रोमँटिक वातावरण होते, ते एन्जॉय केले. धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच खूप छान वाटत होता. निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात…
बायको म्हणाली : बरोबर येताना धुणं घेऊन आले असते तर बरं झाले असते … !


बायको माहेराहून परत आली. नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते, “असे काय हसताय?”
नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.”


एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात. तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो, “काका काल वाली जास्तच मस्त होती”
नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय 🙂


Navra Bayko SMS Jokes


लहानपणीची अफवा
बेडकाला दगड मारला की मुकी बायको मिळणार
जाम घाबरायचो तेव्हा
आता वाटतंय, दगड मारला असता तर बरे झाले असते


दारुडा नवरा अर्ध्या रात्री दारू पिऊन आला आणि दरवाजा खटखटवला
बायको : मी दरवाजा उघडणार नाही, इतक्या रात्री जिकडून आलात तिकडेच चालते व्हा.
नवरा : दरवाजा उघड नाहीतर समोरील नाल्यात उडी मारून मी माझा जीव देईन.
बायको : मला काही फरक पडणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा.
यानंतर नवरा गेट जवळील अंधाऱ्या भागात जाऊन उभा राहतो आणि २ मिनिटं वाट बघितल्यानंतर एक मोठा दगड उचलतो आणि नाल्यात फेकतो… धपाक!
बायकोने हे ऐकल्यावर दरवाजा उघडला आणि लगेच नाल्याकडे पाळली.
अंधारात उभ्या असलेल्या नवऱ्याने दरवाज्याकडे धूम ठोकली व त्याने आतून दरवाजा बंद केला.
बायको : दरवाजा उघडा नाही तर मी ओरडून ओरडून आख्खी चाळ जागी कारेन.
नवरा : जो पर्यंत सारे शेजारी जमा होत नाहीत तो पर्यंत मोठ मोठ्याने ओरड, मग मी त्यांच्यासमोर तुला विचारीन की एवढ्या रात्री तू कुठून येते आहेस?


नवरा : अग ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी अख्ख शहर बदलून टाकीन, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर पूर्ण देश बदलून टाकीन.
बायको : तुम्हाला कोणी चावलं की काय? लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन… दारू कमी प्या… लुंगी समजून माझा पारकर घातलाय तो बदला आधी


एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”
माणूस : हो, फक्त बायकोचे नाव
देव हसला अन म्हणाला, सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही


बायको : माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय
नवरा : अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?


बायको : कशी दिसतेय मी आज
नवरा : छान दिसत आहेस
बायको : असं नाही, एक शेर म्हणा ना माझ्यासाठी
नवरा : ये जो लग राही हो तुम इतनी प्यारी … इस मे पगार लग जाती है मेरी सारी


Marathi Husband and Wife Jokes Collection


तो तिला अत्त्यंत लाडात येऊन म्हणाला “आय विल डाय फॉर यु …”
ती चढ्या आवाजात उत्तरली “आज नको, आज कामं आहेत खूप… डाय अनादर डे”
मग त्याने नाराजीने गोदरेज हेअर डाय परत ड्रॉवर मध्ये ठेवून दिला


बायको : आहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले
नवरा : कसे काय?
बायको : एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला
नवरा : मग तिसरा?
बायको : तिसरा त्याने फेकून मारला


बायको : माझ्या आईचं ऐकलं असतं आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.
नवरा : काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?
बायको : हो
नवरा : अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो


एकदा एका राजाने बायकोचे ऐकणारे आणि न ऐकणारे पुरुष पाहायचे ठरवले. ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रंग करायला सांगितले. सर्व पुरुष बायकोचे ऐकणारे याच रांगेत उभे होते. फक्त एकच पुरुष न ऐकणारे अशा रांगेत उभा होता.
राजा म्हणाला : वा तू एकटाच बायकोच न ऐकणारा खरा पुरुष आहे.
त्यावर पुरुष म्हणाला : नाही … मला बायकोनेच येथे उभे राहायला सांगितले आहे.


काल रात्री उशिरा घरी पोहोचलो. बराच वेळ बेल वाजवली पण बायकोने काही दर उघडलं नाही. शेवटी आख्खी रात्र रस्त्यावर काढली.
मित्र : मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?
नही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय आणि चावी माझ्या खिश्यातच आहे.
तात्पर्य – कमी प्या रे


हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात
डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?
तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके
तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका


Navra Bayko Funny Marathi Jokes SMS


नोकरी सुद्धा बायकोसारखी असते
एक असताना दुसरी करता येत नाही आणि
जी आहे ती सोडून दुसऱ्या सर्व चांगल्या वाटतात


पतीचे फेसबुक स्टेट्स : उत्तुंग निळ्याशार आकाशात झेप घेऊन क्षितिजाला गवसणी घालावीशी वाटते आज
पत्नीची कमेंट : धरतीवर पदस्पर्श झालाच तर एक दुधाची पिशवी आणि काहीतरी भाजी घेऊन या घरी


बायको : (लाजत) आहो मला सांगा ना, मी तुम्हाला किती आवडते?
नवरा : खूप खूप आवडते गं …
बायको : असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा ना प्लिज
नवरा : म्हणजे इतकी आवडते की असं वाटतं तुझ्यासारख्या ५-६ बायका अजून कराव्यात


नवरा : माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय, ताबडतोब अँब्युलन्स ला फोन लाव
बायको : हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा
नवरा : राहू दे, थोडं बरं वाटतंय आता


नवरा : हल्ली तुझे उपवास नसतात का? लग्नाआधी बरेच करायचीस ना?
बायको : हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा


बायको : तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत
नवरा : निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का तू?


बायको : आहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते
नवरा : हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल ???


नवरा : कुठे गेली होतीस?
बायको : रक्तदान करायला
नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं


Navra Bayko Jokes in Marathi


नाजूक फुलापासून भोपळा कसा तयार होतो हे वनस्पती शास्त्रापेक्षा लग्नानंतर जास्त समजते
– एक नवरा


बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते. नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो
नवरा : याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?
बायको : ते काय आहे ना, केसर संपलं आहे म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.
ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम” (नवऱ्याने विमल सोडली)


बायको : आलू पराठा बनवू का तुम्हाला ?
नवरा : नको मी माणूसच ठीक आहे … आली मोठी जादूगारीन


एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही
बायको : जेवलात का ?
नवरा : (तिची नक्कल करत) जेवलात का ?
बायको : माझी नक्कल करू नकोस
नवरा : माझी नक्कल करू नकोस
बायको : चल शॉपिंग ला जाऊ या
नवरा : जेवलो मी


बायको : काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय. का एवढा उशीर झाला घरी यायला ?
नवरा : स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहे ना तो पाहत होतो
बायको : मग आणली का नाही एखादी ?
नवरा : नेसलेल्या होत्या ना !!


नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं
भाजीवाला विचारतो : मैडम खूप शिकलेल्या आहेत वाटतं
नवरा (खुश होऊन) : हो इंजिनियर आहे ती, तुम्हाला कसं कळलं ??
भाजीवाला : त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला


Navra Bayko Funny Jokes


संशयाची हद्द झाली राव … जेव्हा पतीची बायपास सर्जरी झाली पत्नीने सर्जनला एकच प्रश्न केला …
ह्यांच्या हृदयात कोणी दुसरी होती का हो ????


पेट्रोल पंपावर पहिले प्रत्येकजण आपल्या बायकोला पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता
मी खूप विचार केला असे का ?
नंतर तिथला बोर्ड पहिला आणि खूप हसलो राव … लिहिलं होतं, “आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात”


दोन जिवलग मैत्रीण गप्पा मारत होत्या
पहिली : अग तुला सांगू, काल भलतीच गडबड होता होता वाचली
दुसरी : का ग काय झालं ?
पहिली : अग मी देवळात गेले होते. मी देवापाशी मागणार होते की यांचे सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून.
दुसरी : मग त्यात काय ?
पहिली : पटकन लक्षात आलं आणि थांबले … म्हटलं मलाच उचलायचा देव


बान्या : माझी बायको फार रागीट आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर चिडत असते
मन्या : माझी बायको पण फार रागीट होती पण आता शांत झालीय
बान्या : कशी काय ? काय केलं तू ?
मन्या : काही नाही. मी एकदा म्हटलं म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच … तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली


बायको सोबत असताना एखाद्या मुलीकडे लक्ष जावे आणि तिने ते अचूक पकडावे…. आता पहा रिएक्शन राशींच्या …
मेष : मी तिच्याकडे नाही ती माझ्याकडे पाहत होती
वृषभ : अग तिचा ड्रेस काय छान आहे तुला तसाच घ्यायचा विचार करतोय म्हणून आपलं …
मिथुन : अग मी सहज समोर पाहिलं तर ती दिसली मग लक्ष गेलंच ना
कर्क : अग तुझ्या गळ्याची शप्पत चुकून ती माझ्यासमोर आली
सिंह : मी तिच्याकडे पाहिलं तुझ्याकडं पाहतो तसे
कन्या : अग मी तिच्याकडे नाही ग तिच्या डोळ्यांकडे पाहतोय. तू पन बघ
तूळ : अग मी तुझ्याकडेच पाहतोय… तू का तिच्याकडे पाहतेस
वृश्चिक : रोजच तुझ तोंड पाहतो ना …. तेव्हा म्हणतेस का माझ्याकडे का बघताय म्हणून ?
धनु : आता आज रस्त्याने सगळ्याच सुंदर बायका चालल्यात तर मी काय डोळे बंद करून चालू काय ?
मकर : खरच खूपच सुंदर आहे ग … पण तुझ्यासारखी तूच
कुंभ : मी तिच्याकडे पाहतोय हा गैरसमज दूर कर आधी
मीन : अरेच्या मला वाटलं तुझं लक्ष नाही म्हणून मी पाहत होतो तिच्याकडे


Marathi Navra Bayko Jokes


एका स्त्रीने शेअर केले
काल नेट बंद होते म्हणून नवऱ्या सोबत गप्पा मारल्या
चांगला वाटला तो स्वभावाने …


बराच वेळ मेसेज टाइप करत होतो पण होतच नव्हता, मला वाटलं मोबाईल बिघडला
बायको बोलली नेतॆ झोपा आता, तुम्हाला जास्त झालीय, ठेवा तो Calculator आहे


बायको : माझ्यासाठी वाघाची शिकार करा, मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे
नवरा : अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग …
बायको : ठीक आहे, तुमच्या मोबाईल मधले व्हाटसप चे मेसेजेस दाखवा
नवरा : वाघ साधा हवा की पांढरा ??


ज्याप्रमाणे पापाचा घडा भरला कि मृत्यू होतो
त्याचप्रमाणे आनंदाचा घडा भारताच लग्न होतं !
– एक थोर विचारवंत


रविवारी एका मित्राने दुसऱ्या मित्राला landline वर फोन केला तर तो फोन त्याच्या बायकोने उचलला. तो मनातल्या मनात बोलला “हे देव हि कुठून आली?”
मित्राची बायको : हैल्लो, कोण बोलतय?
मित्र : मै अमिताभ बच्चन बोल राहा हू कॊन बनेगा करोडपती से और आपके पती के मित्र हॉट सीट पार बैठे है और आपके पति की हेल्प चाहते है, उन्हें फोन दीजिये मैडम।
मित्राची बायको रोमांचित होऊन फोन देते.
मित्र : सवाल ये है आज शाम को तुम कहा मिलोगे (A) पवन बार (B) विशाल बार (C) अजय बार (D) साईं बार
मित्र : ऑप्शन D
मित्र : धन्यवाद ! और अब आपका समय समाप्त होता है.
बायकोचा आनंद आता गगनात मावत नवता …. बेवडे मित्र काहीही करू शकतात


Husband Wife Jokes in Marathi


तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असताना बदला
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चे चैनल पण बदलू शकत नाही.


गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी
सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी


एक बाई कपडे धुताना दुसरीला – तू वापरतेस तोच साबण मीही वापरते पण तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे ?
दुसरी – आगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे असे समजून धोपटते … म्हणून


नवरा : (खूप संतापून) फोने का नाही उचलला ?
बायको : मी रिंगटोनवर नाचत होते


माणूस : केस बारीक कापा
कटिंग वाला : किती बारीक कपू ?
माणूस : बायकोच्या हातात येणार नाही इतके


Marathi Navra Bayko Jokes


प्रतियोगतेत पैज लागली होती कि सुखाचे तीन शब्द लिहा … सगळे विचार करत होते
मी लिहिलं “बायको माहेरी गेली”
आयोजकांनी मला स्टेज पर्यंत उचलून नेलं… बक्षीस देवून घरापर्यंत वाजत गाजत सोडून गेले
आता घराच्या बाहेर बसलोय “बायको दरवाजा उघडत नाहीये”


बायको आकाशात चांदणी बघून म्हणते
अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही?
नवरा : शेजारीण !


ज्यांच्या नशिबात “प्रायश्चित” लिहिलेलं असतं …
शक्यतो त्यांच्या बायका सुट्टीला “माहेरी” जात नाहीत


रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो “बघ मी तुझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो की नाही?”
हजर जबाबी बायको उत्तर देते ” एकदम टक्कल करायचे म्हणजे जन्म झालेल्या बाळासारखे दिसला असता.”


Marathi Husband Wife Jokes


नवरा बायको मध्ये भांडण चालू होत…
नवरा : मी भीत नाही तुला
बायको – भीत कसं नाही? मला बघायला येताना ५-६ लोक घेवून आला,
लग्नाच्या वेळी ३०० लोक घेवून आला, हो कि नाही ?
नवरा : हो
बायको : मी बघा वाघिणी सारखी लग्न करून एकटी आले व एकटीच राहते


 बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला, “पुरूष तिलाच मारतो जीच्यावर तो प्रेम करतो”
बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे फटके मारुन म्हणाली,
“तुम्ही काय समजता,की माझं तुमच्यावर प्रेम नाही?”


पती फोनवर बायकोला विचारतो : जेवायला काय बनवले आहे ?
बायको चिडून सांगते : विष
पती : जेवून झोप, मला यायला उशीर होणार आहे


2 thoughts on “Navra Bayko Jokes

Leave a Reply

Your e-mail address will not be published. Required fields are marked *