Nakavarchya Ragala Aushadh Song Lyrics in Marathi

नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय
माझी लाडली ग, माझी गोडली ग
सांगा आमच्या छकुली ला झाल तरी काय
नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय

त्याच काय झाल! एक होती मुलगी
एकदा की नाही, ती जाम रुसली
जाम रुसली, जाम रुसली, कोपर्‍यात जाऊन बसली
काही केल्या हसेना, कुणाशी बोलेना
साऱ्या घराला अस झाल की
दे माय धरणी ठाय

नाकावरच्या रागाला औषध काय
गालावरच्या फुग्यांच म्हणण तरी काय

मग तिला समजवायला कोण कोण आल माहितीय
आधी आल अस्वल, बसल मारून फतकल
कारण त्याच्या लक्षात आलं
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल
त्याच्या चड्डीच तुटलय बक्कल

मग आला ससा
पांढरा शुभ्र लोकरीचा गुंडा कसा म्हणतो
बगा बगा मी तिला हसवतो कसा
पण झाल काय माहितीय
गेला रडत रडत, स्वतः हाच ढसा ढसा

माकडोबा आले उडी मारत टना टना
इवल्या बावल्या केल्या
पण त्याची हि दैना

एकपण काय कुणाचाच काय चालेना उपाय
चालेना चालेना चालेना उपाय

मग आला मामा
उंदीर मामा? अं हं
मग चांदोमामा!
नाही रे,छोटू मामा
त्याचा काही न्यारंच छंद

पाहून सारा राग रंग
तो म्हणतो कसा
मंडळी हो ऐका सांगतो गोष्ट दोन मुलांची
पांडू ची बंडू ची, पांडू आणि बंडू ची
पांडू आणि बंडू, दोन होती मुल,
एक होत शहाणं, एक होत खुळं

पांडू होता हुशार, बंडू होता मट्ठ
पांडू ऐके आईच, बंडू करी हट्ट
पांडू होता पट्ट्या, बंडू होता रड्या
पांडू खाई पेढे, बंडू खाई छड्या
आये आये आये…आये
पांडू होता गुणी, बंडू होता गुच्छ
मी आहे पांडू आणि बंडू कोण? तूच!

तूच! तूच! तूच! तूच!

अरे हि पोरगी बोली की आणि हसली सुद्धा

नाकावरच्या रागाला औषधं काय
ला ला ला
नाकावरच्या रागाला औषधं काय
ला ला ला
नाकावरच्या रागाला औषधं काय
गालांचा थवा न ओठांची साय

गीत – सुधीर मोघे
स्वर – मेघना साठे, प्राची मयेकर
चित्रपट – कळत नकळत, १९८९