Naam Vithobache Ghyave Abhang Lyrics in Marathi

नाम विठोबाचें घ्यावें
मग पाऊल टाकावे ॥१॥

नाम तारक हें थोर
नामें तरिले अपार ॥२॥

अजामेळ उद्धरिला
चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥

नाम दळणीं कांडणीं
म्हणे नामयाची जनी ॥४॥

-संत जनाबाई