Mungi Udali Aakashi Abhang Lyrics in Marathi

मुंगी उडाली आकाशीं
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥

थोर नवलाव जांला
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥

विंचु पाताळाशी जाय
शेष माथां वंदी पाय ॥३॥

माशी व्याली घार झाली
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥

– संत मुक्ताबाई