Muli Yet Nahit Maheri Kahi Ghyayla

मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला
मुली येतात माहेरी आपल्या मुळांना प्रेमाचा ओलावा द्यायला

त्या येतात भावांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला
त्या येतात आपलं लहानपण शोधायला

त्या येतात अंगणात स्नेहाचा दीपक ठेवायला
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला

मुली येतात काळा दोरा दारावर बांधायला
कुणाची द्रुष्ट लागू नये म्हणून आपल्या घराला

त्या येतात मायेच्या झऱ्याखाली स्नान करायला
त्या येतात सगळ्यांना आपलं थोडं थोडं प्रेम द्यायला
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला

मुली जेव्हा परत जातात सासरी
बरच काही जातात सोडून त्या आपल्या माहेरी

तिचे गोड हसणे आठवले की
नकळत सर्वांचे डोळे होतात ऒले काठावरी

जेव्हाही मुली येतात आपल्या माहेरपणाला
खरं तर त्या येतात आपल्या प्रेमाच्या वैभवाची उधळण करायला
मुली येत नाहीत माहेरी काही घ्यायला

खूप चंचल खूप आनंद देणाऱ्या असतात या मुली
नाजूक मनाच्या आणि भोळ्या असतात या मुली

छोट्या छोट्या गोष्टींवर रडणाऱ्या निष्पाप असतात या मुली
प्रेम वात्सल्य भरभरून असणाऱ्या देवाची देणगी असतात या मुली

घर कसं प्रफुल्लीत होतं जेव्हा हसतात या मुली
काळजाचं पाणी होतं लग्न होऊन जेव्हा दुसऱ्याच्या घरी जातात या मुली

खूप एकट एकट वाटत किती रडवून जातात या मुली
आनंदाचं प्रतिक, आई बाबांच्या खूप लाडक्या असतात या मुली

हे मी नाही तर साक्षात देव म्हणतो कि
मी जेव्हा खूप प्रसन्न असतो तेव्हा जन्म घेतात या मुली

Kavi – Unknown