Mrityu Marathi Sad Kavita

सजवत होते मला, मी शांत निजलो होतो
बहुतेक आसवांच्या धारेने मी चिंब भिजलो होतो

शेवटची आंघोळ ती होती गरम पाण्याची
ज्याला त्याला घाई मला डोळे भरून पाहण्याची

ज्यांच्या खांद्यावर माझं गेलं होतं बालपण
त्यांनीच पुन्हा उचलून घेतलं आज पण

जवळचे सारे होते होतं कुणीतरी परकं
नेऊ नका मोठ्यानं म्हणत होतं सारखं

आज वेगळंच काहीतरी घडत होतं
वैऱ्याचहि प्रेम माझ्यावर पडत होतं

तिथपर्यंत नेउन सुद्धा माझ्यावर प्रेम लुटवट होते
जोरजोरात रडून सगळे मला उठवत होते

अजून चार लाकडं द्या म्हणजे तेवढ्यात भागेल
माझ्याच कुणीतरी विचारलं अजून किती वेळ लागेल

सरणावर झोपूनही मी मौन पाळल होतं
जीव लावणाऱ्या माझ्यांनीच मला जाळल होतं

कवी – अज्ञात