Mi Maze Mohit Rahile Nivant Abhang Lyrics in Marathi मी माझें मोहित राहिलें निवांत । एकरूप तत्व देखिलें गे माये ॥१॥ द्वैताच्या गोष्टी हरपल्या शेवटीं । विश्वरुपें मिठि देतु हरी ॥२॥ छाया-माया-काया हरिरूपीं ठायी । चिंतिता विलया एक तेजीं ॥३॥ ज्ञानदेवा पाहा ओहंसोहंभावा । हरिरूपीं दुहा सर्वकाळ ॥४॥ – संत ज्ञानेश्वर