Mi Aale Nighale Song Lyrics in Marathi

मी आले, निघाले
सजले फुलले
फुलपाखरू झाले
वेग पंखाना आला असा

आल्या या लकेरी घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले

नील नभातुन विहरत जाऊ
लहरत पाण्यावरी
जीवन जगुया रंग मजेचे
उधळीत स्वप्नापरी
नील नभातुन विहरत जाऊ
लहरत पाण्यावरी
जीवन जगुया रंग मजेचे
उधळीत स्वप्नापरी
यौवन म्हणजे गम्मत जम्मत
सुख हे जन्मताले

मी आले, निघाले

तोडून टाकू बंध पुराने
जाऊ चल नव तिकडे
फूल पंखानी मारू भरारी
झेप घेऊ आता पुढे
तोडून टाकू बंध पुराने
जाऊ चल नव तिकडे
फूल पंखानी मारू भरारी
झेप घेऊ आता पुढे
आनंदाचे विश्वच आम्ही
येथे केले खुले

मी आले, निघाले
सजले फुलले
फुलपाखरू झाले
वेग पंखाना आला असा

आल्या या लकेरी घेतली भरारी
तुफानापरी बेभान मी झाले

गीत – परडकर
संगीत – अरुण पौडवाल
स्वर – अनुराधा पौडवाल
चित्रपट – गंमत जंमत