Mazi Renuka Mauli Abhang Lyrics in Marathi

माझी रेणुका माउली, कल्पवृक्षाची साउली ।
जैसी वत्सालागी गाय, तैसी अनाथांची माय ॥१॥

हाकेसरशी घाई घाई, वेगे धावतची पायी ।
आली तापल्या उन्हात, नाही आळस मनात ॥२॥

खाली बैस घे आराम, मुखावरती आला घाम ।
विष्णुदास आदराने वारा घाली पदराने ॥३॥

– संत विष्णुदास