Maze Manorath Purna Kari Deva Abhang Lyrics in Marathi माझे मनोरथ पूर्ण करि देवा । केशवा माधवा नारायणा ॥१॥ नाहीं नाहीं मज आणिक सोयरा । न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥ अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा । किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥ नामा ह्मणे जीव होतो कासावीस । केली तुझी आस आतां बरी ॥४॥ – संत नामदेव