Maza Bhav Tuze Charani Abhang Lyrics in Marathi माझा भाव तुझे चरणीं तुझें रूप माझे नयनीं ॥१॥ सापडलों एकामेकां जन्मोजन्मीं नोहे सुटका ॥२॥ त्वां मोडिली माझी माया मी तो जडलों तुझिया पायां ॥३॥ त्वां मज मोकलिले विदेही मी तुज घातले हृदयीं ॥४॥ नामा म्हणे गा सुजाणा सांग कोणे ठकविलें कोणा ? ॥५॥ – संत नामदेव