Marathi Ukhane Funny

सकाळी सकाळी बागेत तोडत होते काळ्या
….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या


महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी, महादेवाच्या पिंडी समोर उभा आहे नंदी
XXXX रावांचे नाव घेते, आयताचे क्षेत्रफळ – लांबी गुणिले रुंदी


चांदीच्या किचन मध्ये सोन्याच्या ओटा
XXXX चे नाव घेते, केसात माझ्या हजार पाचशेच्या नोटा


तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA
नंतर ती त्याला फोन करून म्हणते, “धन्यवाद भावा”


निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
XXXX रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान


सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन


पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहते रजनी
…. चे नाव घेते मी त्यांची साजणी


अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
…. चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?


तेलाच्या दिव्याला तुपाची वात
XXXX रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट


काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
…. बरोबर असले की हवाय कशाला हमाल


रंगीत सुंदर हरणाचे फेगडे फेगडे पाय
… राव आजून नाही, कुठे पडले की काय?


Marathi Ukhane Comedy


दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक,
ताकाचा केला मठ्ठा, …. चे नाव घेतो …. रावान् चा पठ्ठा


सासऱ्याच्या मांडवात पंचपक्वांनाच्या राशी,
पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.


वड्यात वडा बटाटा वडा, XXXX रावांनी मारला खडा म्हणून जमला आमचा जोडा


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
…. हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्


Marathi Vinodi Ukhane


चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, घास भरवते मरतुकड्या, थोबाड कर इकडे


सचीनच्या बॅटला करते नमस्कार वाकून, …. चे नाव घेते पाच गडी राखून


एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ


लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास


Funny Marathi Ukhane


कुत्र्यात कुत्र अल्सेशिअन कुत्र, …. नी माझ्या गळ्यात बांधले मंगळ्सूत्र


पावाबरोबर खाल्ले अमूल बटर, …. चे नाव घ्यायला अडलय माझ खेटर


रेशमी सदर्‍याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल


रेडिओ मीर्ची एकते कानात हेडफोन टाकून
…. रावांना मिस कॉल देते १ रुपया राखून


Ukhane in Marathi Comedy


इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव
…  रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव


श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा
…. रावांना आवडतो गरम गरम बटाटेवडा.


अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड
…. राव हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड


Ukhane is an integral part of almost all Maharashtrian functions and celebrations. We have combined funny Marathi ukhane from different sources and put them together here on this page. These funny Marathi ukhane comes with high degree of humor and defuse laughter among the people.

Liked it? Share with your friends...

7 thoughts on “Marathi Ukhane Funny

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *