
अर्जुनाला श्रीकृष्णाने केलेल्या उपदेशातून निर्माण झाला ग्रंथ गीता
…. रावांचे नाव घेऊन येते मी आता
चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
…. रावां समवेत ओलांडते माप
लग्न मंडपामध्ये पसरले सनईचे मंजुळ सूर
…. च्या साठी माहेर केले दूर
सासरच्या निरांजनात तेवते माहेरची फुलवात
…. च्या बरोबर आ संसाराला करते सुरवात
माहेरची नाती जणू रेशमाच्या गाठी
रेशीमबंध सोडून सासरी आले …. च्या साठी
मेंदीने रंगले हात, दागिन्यांचा चढविला साज
…. शी विवाह केला, नववधू बनले आज
Ukhane in Marathi for Marriage
गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
…. व घेते सोडा माझी वाट
माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा
…. रावांनीनी त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा
मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
…. रावांनी दिला सौभाग्याचा आहेर
बारिक मणी घरभर पसरले, …. रावांसाठी माहेर विसरले
राजहंसाच्या पिल्लास चारा हवा मोत्याचा
…. रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा सौभाग्याचा
प्राजक्ताच्या फुलांनी भरले आंगण
…. रावांचे नाव घेऊन सोडले कंकण
Marathi Ukhane for Wedding
मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खूण,
…. रावांचे नाव घेत …. ची सून
फुल आहे गंध भाव आहे अंतरी,
…. रावांसह चालले सात पावलांवरी
लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडू
XXXX रावांना घास देताना मला येई गोड हसू
फुलासंगे मातीस सुवास लागे,
…. राव आणि माझे जन्मो जन्माचे धागे
तु्ळजा भवानीची कृपा आणि खंडोबाचा आशिर्वाद
माहेरचे निरांजन आणि सासरची फूलवात
…. रावांचे नाव घेउन करते संसाराला सूरवात
Marathi Lagnache Ukhane
सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले,
…. रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले
चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
XXXX रावांच्या जीवनात टाकते मंगलमई पाऊल.
शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी
XXXX राव म्हाजे माझ्या जीवनसाथी
लग्नासाठी मराठी उखाणे – परंपरा, ओळख आणि आनंदाचा सुंदर संगम
महाराष्ट्रातील विवाहसोहळ्यांमध्ये उखाण्यांना एक विशेष आणि मानाचा दर्जा आहे. लग्नाच्या वेळी नवरा-नवरीने एकमेकांचे नाव उखाण्यात घेणे ही एक सुंदर परंपरा आहे, जी नात्यातील आपुलकी, सन्मान आणि गोडवा व्यक्त करते. त्यातल्यात्यात लग्नसमारंभात उखाणा घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरले जाते.
उखाणे म्हणजे काव्यात्मक पद्धतीने, थोड्या विनोदाने आणि कल्पकतेने नाव घेण्याची कला. ही परंपरा केवळ औपचारिक नसून, ती आनंद, हशा आणि आठवणी निर्माण करणारी असते. आजच्या काळातही ही परंपरा लग्न समारंभात तितक्याच उत्साहाने पाळली जाते.
मराठी उखाण्यांचे सांस्कृतिक महत्त्व
मराठी उखाणे ही आपल्या संस्कृतीची ओळख आहेत. लग्नातील विविध विधींमध्ये उखाण्यांचा समावेश केला जातो, जसे की सुपारी फोडणे, साखरपुडा, हळदी, आणि स्वागत समारंभ. नवरा-नवरी उखाण्यांच्या माध्यमातून एकमेकांचे नाव घेतात, ज्यामुळे नात्यातील जिव्हाळा आणि सन्मान दिसून येतो.
लग्नासाठी उखाणे घेणे ही केवळ एक प्रथा नसून, ती एक सांस्कृतिक परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे. यामध्ये पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेचा देखील समावेश दिसून येतो.
लग्न प्रसंगी घेतल्या जाणाऱ्या उखाण्यांच्या लोकप्रियतेमागील काही कारणे:
- परंपरेशी जोडलेली भावना
- प्रत्येक लग्नासाठी वेगळेपणा आणण्याची संधी
- काव्यात्मक आणि मजेशीर शैली
- चांगल्या उखाण्यांची वैशिष्ट्ये
एक उत्तम उखाणा म्हणताना करताना खालील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे:
- शब्दांची सुंदर आणि लयबद्ध मांडणी
- नाव घेण्याची नैसर्गिक आणि सुसंगत पद्धत
- थोडासा विनोद किंवा गोडवा असणे
- सहज लक्षात राहील असा आशय
पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा योग्य समतोल
लग्नासाठी मराठी उखाणे ही परंपरा, भावना आणि आनंद यांचा एक सुंदर संगम आहे. या उखाण्यांमुळे विवाहसोहळ्याला एक वेगळा रंग आणि उत्साह मिळतो. योग्य शब्दांची निवड आणि कल्पकतेमुळे हे उखाणे अधिक खास बनतात.
